Wheat Sowing Nearly Complete In Rabi Season: चालू रब्बी हंगामातील गहू पीक पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. सध्या पिकाची स्थिती चांगली दिसत आहे. यंदा गहू पिकाखालील क्षेत्र गेल्या वर्षीएवढेच क्षेत्र व्यापू शकते, असे केंद्रीय कृषी आयुक्त पी. के. सिंह यांनी गुरुवारी सांगितले. सध्याच्या २०२५-२६ मधील रब्बी हंगामात २९ डिसेंबरपर्यंत ३२२.६ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली. मागील वर्षी याच कालावधीत ३२८ लाख हेक्टरवर गहू पीक क्षेत्र होते, असेही ते म्हणाले. ."बिहारचा काही भाग वगळता, देशभरात गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाच्या हंगामात एकूण पिकाखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या पातळीपर्यंत पोहोचू शकते," असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पेरणी केलेल्या ७३ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात हवामान अनुकूल आणि बायो-फोर्टिफाइड बियाणे वाणांची पेरणी करण्यात आली आहे. यामुळे पिकाला हवामानातील कोणत्याही प्रतिकूलतेचा सामना करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले..Rabi Sowing: बुलडाण्यात रब्बी पिकांची पेरणी १०० टक्क्यांवर."वेळेवर आणि लवकर पेरणी झाल्यामुळे गव्हाच्या पिकाची वाढ चांगली दिसत आहे. सध्या पीक अवस्था अगदी चांगली आहे. गहू पीक क्षेत्रातून कोणतीही समस्या आल्याची नोंद झालेली नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले. .Rabi Crop Loan: पीक कर्जासाठी वाढीव निधीची गरज.कडधान्ये आणि तेलबियांची पेरणी पूर्ण झाली आहे. दक्षिण भारतात भात लागवड जानेवारीच्या अखेरपर्यंत कायम राहील. हरभरा आणि मोहरी-रॅपसीड पीक क्षेत्रात वाढ झाली आहे. यामुळे रब्बी हंगामातून चांगले पीक उत्पादन मिळाले अशी अपेक्षा आहे, असे सिंह यांनी सांगितले..गव्हाच्या भरघोस पीक उत्पादनामुळे सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठी पुरेसा पुरवठा सुनिश्चित होईल. तसेच कडधान्ये आणि तेलबियांच्या चांगल्या उत्पादनामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. रब्बी पिकांच्या पेरणीला ऑक्टोबरपासून सुरुवात होते. तर त्यांची काढणी मार्च महिन्यापासून सुरू होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.