Turmeric Harvesting : गिरगाव परिसरात हळद काढणीस सुरुवात‌                            

Turmeric Production : इसापूर येलदरी धरणाच्या कालव्याच्या पाण्यावर गतवर्षी (२०२३) मे ते जून महिन्यात हळद लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केली होती.
Turmeric
TurmericAgrowon

Hingoli News : गिरगाव (ता. वसमत) व परिसरातील गाव शिवारात यंदाच्या हळद काढणीस सुरवात झाली आहे. काढणी चे दर एकरी १३ हजार रुपयांहून अधिक आहेत.

गिरगाव, परजना, खाजमापुर वाडी, सोमठाणा, पार्डी बुद्रूक, डिग्रस खुर्द, मुंरुबा माळवटा आदी भागात इसापूर येलदरी धरणाच्या कालव्याच्या पाण्यावर गतवर्षी (२०२३) मे ते जून महिन्यात हळद लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केली होती. ती हळद काढणीस तयार झाली आहे.

Turmeric
Turmeric Research Center : वसमतच्या हळद संशोधन केंद्रासाठी १४ कोटी मंजूर

या भागात पिंपळदरी सह गावातील मजूर हळद काढणीस येत आहेत. काढणीसाठी एकरी १३ हजार रुपयांहून अधिक भाव आहेत. पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

एकरी हळदीचा उतारा ८ ते १० क्विंटलपर्यंत येत आहे. यामुळे खर्च जास्त झाला पण उत्पादन कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.    

Turmeric
Turmeric Market : हळदीच्या दरात क्विंटलला दोन हजार रुपयांनी सुधारणा
हळद काढणीस आली आहे पण करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने  उत्पादनात घट होणार आहे. यामुळे खर्च जास्त येत असल्याने यांचा फटका बसणार आहे .
होणाजी गायकवाड, हळद उत्पादक, शेतकरी, परजना 
गिरगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून हळद काढणीस सुरवात केली आहे खोदून हळद काढावी लागते यामुळे एकरी तेरा हजार रुपये मजुरी भाव घेत आहोत.         
प्रभाकर गाढवे, हळद काढणी, मजूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com