Onion Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : देशातील बाजारात लाल कांद्याची आवक वाढलेलीच

Market Rate : सध्या बाजारात कांदा १ हजार ७०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. मागील दोन आठवडे कांदा बाजार कोसळल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीन तसेच सोयापेंड दरावरील दबाव कायम आहे. सोयाबीनचे वायदे कालच्या तुलनेत आज काहीसे वाढून १३.१८ डाॅलरवर होते. पण सोयापेंडचे वायदे आजही ४०० डाॅलरपेक्षा कमीच आहेत. दुपारपर्यंत सोयापेंडचे वायदे ३९८ डाॅलरवर होते.

तर देशातील बाजारात सोयाबीनचे भाव आजही ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दिसले. देशातील बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव दिसून आला. तर आंतरराष्ट्रीय बाजारावर ब्राझीलमधील परिस्थितीचा दबाव आहे.

कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजारात दोन दिवसांपासून ८० सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमीच दिसत आहे. आजही ७९.३२ सेंटवर बाजार होता. देशातील बाजार मात्र स्थिर होता. देशातील बाजारात कापसाला आजही ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान आहे.

कापसाच्या बरोबरच सरकीवरील दबावही कायम आहे. सरकीला सध्या २ हजार ५०० ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापूस बाजारातील आवक आणखी एक ते दीड महिना कायम राहू शकते, असा अंदाज आहे.

निर्यातबंदीनंतर पडलेला कांदा बाजार अजूनही सावरलेला नाही. लाल कांद्याची बाजारातील आवक वाढत असतानाच निर्यातबंदी केल्यामुळे भावावर मोठा दबाव दिसून आला. बाजारातील कांद्याची आवक अजूनही जास्त दिसते. तर सध्या बाजारात कांदा १ हजार ७०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे.

मागील दोन आठवडे कांदा बाजार कोसळल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील लाल मिरची उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे.  आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मिरची पिकाला यंदा फटका बसला. परिणामी उत्पादकता घटली आहे. सध्या लाल मिरचीला १८ हजार ते ३२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे.

महाराष्ट्रातील मिरची पट्ट्यातही सध्या भाव चांगले आहेत. यंदा दुष्काळामुळे यापुढील काळात मिरची उत्पादन घेणे शेतकरी टाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरचीच्या भावातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

देशातील बाजारात ज्वारीचे भाव तेजीत आहेत. बाजारातील पुरवठा कमी आणि मागणी जास्त यामुळे ज्वारीचे भाव वाढले आहेत. बाजारात सध्या ज्वारीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणं भाव मिळतोय. मालदांडी ज्वारीचे भाव सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजारांच्या दरम्यान पोचले. तर हायब्राडी ज्वारी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

पांढरी आणि दादर ज्वारीचा भाव ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसतो. बाजारातील आवक आणखी काही दिवस कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीच्या भावातील तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT