Onion Export : कांदा निर्यात सुरू करा

Onion Market Update : गेल्या पंधरवड्यात आवक कमी होती, मात्र गेल्या सप्ताहात राज्यभर कांदा आवक वाढली आहे.
Onion Export
Onion Export Agrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महसंचालनालयाच्या ७ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध अधिसूचनेनुसार ३१ मार्च २००२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी केल्याने दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. कांदा व्यापारी व निर्यातदारसुद्धा अडचणीत आहेत.

गेल्या पंधरवड्यात आवक कमी होती, मात्र गेल्या सप्ताहात राज्यभर कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढता असल्याने कांदा निर्यात बंदी मागे घेऊन निर्यात सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील बाजार समित्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.

Onion Export
Onion Export Ban : ग्राहकहितासाठी कांदा उत्पादकांचा बळी

कुठलीही अवास्तव दरवाढ नसताना, ग्राहकांची ओरड नसताना चुकीच्या माहितीच्या आधारे केंद्राने अचानक निर्यात बंदी केली. परिणामी निर्यातबंदीमुळे सर्वच घटकांवर विपरीत परिणाम जाणवत आहे.

आर्थिक नुकसान झाल्याने कोंडी वाढत आहे, तर राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रात कांदा उत्पादनात वाढ झालेली आहे. त्यामुळे डिसेंबर व जानेवारी या महिन्यांमध्ये प्रचंड आवक असल्याने कांदा निर्यात करणे अत्यंत गरजेचे असल्याचे बाजार समित्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Onion Export
Onion Export Ban : कांद्यानं शेतकऱ्यांची वाट बिकट केली, बसला कोटींवर फटका

केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी यांनी केंद्र व राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लाल खरीप कांदा साठविण्यायोग्य नसल्याने शेतकऱ्यांना कांदा काढणीनंतर लगेच विक्री करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे दर वर्षी बाजार आवारांवर लाल खरीप कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. लवकरच बाजार आवारावर लेट खरीप रांगडा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होणार असल्याने डिसेंबरअखेर आवकेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
- बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com