Soybean Quality agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनच्या वायद्यांमध्ये पुन्हा नरमाई

Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे ११.७७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

अनिल जाधव

Pune News : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे ११.७७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३६० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचा भाव आजही दबावातच आहे. सोयाबीनला आजही बाजारात सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. देशातील बाजारात सोयाबीनची ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत कमी होऊन ७३.८४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदेही कमी होऊन ५६ हजार ९०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजारातील कापसाची आवक कायम आहे. त्याचाही परिणाम दरावर दिसून येत आहे. कापसाला आजही सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. ही दरपातळी आणखी काही दिवस राहू शकते, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात कांद्याचा बाजाराभाव टिकून आहे. कांद्याचे भाव बाजारातील कमी आवकेमुळे मागील काही आठवड्यांपासून सुधारले आहेत. सध्या बाजारात कांद्याचा कमाल भाव ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसून येतो. पण सरासरी दरपातळी की ज्या भावात जास्तीत जास्त कांदा विकला जातो तो भाव १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे, यापुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

तुरीचा बाजारात देशात टिकून आहे. आयात तुरीचे भावही जास्तच असल्याने देशातील बाजाराला चांगला आधार आहे. भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे. परिणामी तुरीचा बाजारात मागील काही महिन्यांपासून १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत. रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला होता. ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर उत्पादकता कमी राहील्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण बाजारातील आवक वाढल्याने २ हजार ३०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीवरीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT