Cotton Cultivation : खानदेशात पूर्वहंगामी कपाशी लागवड सुरू

Kharif Cotton : खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीस मागील दोन-तीन दिवसांत आणखी गती आली आहे.
Cotton
Cotton Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीस मागील दोन-तीन दिवसांत आणखी गती आली आहे. लागवड सुरूच असून, यंदा क्षेत्र मागी वर्षाएवढे स्थिर राहील, असे दिसत आहे. कापसाची लागवड खानदेशात १८ मे पासून सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी काळ्या बाजारात बियाणे खरेदी करून किंवा परराज्यातील बियाणे घेऊन १५ मे पूर्वीच लागवड केली आहे.

खानदेशात कापसाची लागवड यंदा काहीशी कमी होईल, असे संकेत आहेत. मागील हंगामात जळगाव, धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे आठ लाख ६० हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यंदा ही लागवड साडेआठ लाख ते आठ लाख ४० हजार हेक्टरवर होईल, असे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण लागवड पाच लाख ६७ हजार हेक्टरवर झाली होती.

Cotton
Cotton Cultivation : मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी बळीराजा सरसावला

यंदा एकूण लागवड पाच लाख ५७ हजार ते पाच लाख ५४ हजार हेक्टरवर कापूस पीक राहील, असे संकेत आहेत. परंतु पूर्वहंगामी कापसाची लागवड स्थिर राहील, असे चित्र असून, लागवडीला मागील दोन ते तीन दिवसांत गती आली आहे. यात पूर्वहंगामी कापसाची सुमारे एक लाख ७० हजार हेक्टरवर खानदेशात लागवड अपेक्षित आहे.

जळगाव जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात लागवड होईल, अशी माहिती आहे. ही लागवड स्थिर राहू शकते. मागील हंगामातही एवढीच लागवड झाली होती. या आठवड्यात कापूस लागवड आणखी गती घेईल. कारण तापमानात काहीशी घट झाली आहे. तापमान जेवढे कमी होईल, तेवढी लागवड गती घेईल. कारण कमी तापमानात बीजांकुरण चांगले होते, असे शेतकरी मानतात.

Cotton
Cotton Seed : पावणे दहा लाख कपाशी बियाणे पाकिटांची उपलब्धता

पुढे पाऊस येईल, असे सांगितले जात आहे. यामुळे लागवड गती घेत आहे. कारण लागवडीनंतर चार-पाच दिवसांत पाऊस आल्यास बीजांकुरण होईल व पुढे पावसात पीक जोम धरेल.

पाणी देण्याची पुढे फारशी गरज राहणार नाही, असेही नियोजन शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात पूर्वहंगामी कापसाखाली अपेक्षित एकूण क्षेत्रातील निम्मी किंवा ६० टक्के लागवड पूर्ण झाली आहे. १० जूनपर्यंत ९० ते ९५ टक्के लागवड पूर्ण होईल. लागवडीपूर्वी शेतात ठिबक अंथरणे व अन्य कार्यवाही शेतकरी करून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com