Tur Farming : तुरीच्या सुधारित वाणांची गुणवैशिष्ट्ये

Tur Cultivation : तूर लागवडीसाठी स्थानिक पर्जन्यमान आणि जमिनीचा पोत आदी बाबींचा विचार योग्य गुणवैशिष्ट्ये असलेल्या वाणाची लागवडीसाठी निवड करावी. लागवडीसाठी सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
Tur Variety
Tur VarietyAgrowon

डॉ. विजयकुमार गावंडे

Tur Variety : तूर हे खरीप हंगामात विस्तृत प्रमाणात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक आहे. सलग तसेच विविध पीक पद्धतीमध्ये तूर पिकाचा समावेश केल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. अवर्षणामध्ये पाण्याच्या अल्प उपलब्धीवर तग धरण्याचा या पिकाचा आनुवंशिक गुणधर्म आहे.

तूर पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमिनीतील आंतरस्तरावरील ओलावा व अन्नद्रव्यांचे शोषण करतात. तूर पिकानंतर लगेच दुसरे पीक घ्यावयाचे असल्यास, लवकर तयार होणारे वाण निवडावेत. आणि तूर पिकामध्ये आंतरपिकांची लागवड करावयाचे नियोजित असल्यास मध्यम ते उशिरा तयार होणारे वाण लागवडीसाठी निवडावेत.

कालावधीनुसार वाणांची निवड

लवकर, मध्यम लवकर परिपक्व होणारे वाण

बी. डी. एन. ७१६

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) येथून २०१६ मध्ये प्रसारित.

मर आणि वांझ या रोगास प्रतिकारक.

पर्जन्यावर अवलंबून असणाऱ्या भागात

ठरावीक वेळेत पेरणीस योग्य.

दाणे लाल व टपोरे आहेत.

१०० दाण्यांचे वजन : ११ ते १३ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी : १६५ ते १७० दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १८ ते २० क्विंटल.

गोदावरी

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) येथून २०२१ मध्ये प्रसारित.

या वाणाची फुले मळकट पांढरे असून दाण्याचा रंग सुद्धा पांढरा असतो.

मर आणि वांझ रोगास प्रतिकारक.

१०० दाण्यांचे वजन : ११ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी : १६० ते १६५ दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १९ ते २४ क्विंटल.

Tur Variety
Tur Farming : देशातील तूर उत्पादनात २० टक्के घटीचा अंदाज

आय. पी. ए. १५-०६

भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथून मध्य भारतात लागवडीसाठी २०२१ मध्ये प्रसारित.

मर रोगास प्रतिकारक तसेच वांझ रोगास

प्रतिकारक्षम.

दाणे लाल रंगाचे.

१०० दाण्यांचे वजन : ९.९ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी : १४५ ते १५० दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १८ ते २० क्विंटल.

फुले तृप्ती

मध्यम लवकर कालावधीचे हे वाण कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याद्वारे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे लागवडीसाठी २०२२ मध्ये प्रसारित.

मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक, तर शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींचा प्रादुर्भाव कमी आढळतो.

दाणे फिक्कट तपकिरी रंगाचे.

१०० दाण्यांचे वजन : १०.६१ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी : १६७ ते १६९ दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी २२ ते २३ क्विंटल.

Tur Variety
Tur Variety : तुरीचे पहिलेच संकरित वाण विकसित

रेणुका

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) येथून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे लागवडीसाठी २०२२ मध्ये प्रसारित.

मर आणि वांझ रोगास प्रतिकारक्षम.

या वाणाच्या शेंगा, फांद्या, खोड हिरवे असून दाण्यांचा रंग लाल असतो.

१०० दाण्यांचे वजन : ११.७० ग्रॅम.

परिपक्वता कालावधी : १६५ ते १७० दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १९ ते २२ क्विंटल.

मध्यम उशिरा आणि उशिरा परिपक्व होणारे वाण

पी.के.व्ही. तारा

हे अधिक उत्पादन देणारे वाण कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याद्वारे २०१३ मध्ये प्रसारित करण्यात आला.

मर रोगास प्रतिबंधक असून वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे.

दाण्यांचा रंग लाल.

१०० दाण्यांचे वजन : ९.६ ग्रॅम.

डाळीचे प्रमाण इतर वाणांच्या तुलनेत ५ ते १० टक्के जास्त आहे.

परिपक्वता कालावधी : १७८ ते १८० दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १९ ते २० क्विंटल.

विपुला

कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून २००६ मध्ये प्रसारित.

मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक.

दाणे लाल रंगाचे.

१०० दाण्यांचे वजन : ९ ते १० ग्रॅम.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १६ क्विंटल.

परिपक्वता कालावधी : १५० ते १७० दिवस.

बी.एस.एम.आर. ७३६

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) येथून १९९४ मध्ये प्रसारित.

मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक तसेच खोड, फांद्या आणि शेंगांचा रंग हिरवा आहे.

दाणे लाल रंगाचे

१०० दाण्यांचे वजन : १० ते ११ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी : १८० ते १९० दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १५ ते १६ क्विंटल.

बी.एस.एम.आर. ८५३

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) येथून २००१ मध्ये प्रसारित.

पांढऱ्या दाण्याचा वाण.

मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक.

१०० दाण्यांचे वजन : ११ ते १२ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी : १७८ ते १८० दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १५ ते १६ क्विंटल.

आशा (आय.सी.पी.एल. ८७११९)

उशिरा तयार होणारे वाण. शुष्क आणि अर्धशुष्क उष्ण कटिबंधावर संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र, हैदराबाद येथून १९९२ मध्ये प्रसारित.

भारी जमिनीस योग्य.

मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक.

दाणे लाल रंगाचे.

१०० दाण्यांचे वजन : १० ते ११ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी : १८० ते २०० दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १२ ते १४ क्विंटल.

पी. डी. के. व्ही. आश्लेषा

हे मध्यम कालावधीचे वाण कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथून २०२२ मध्ये मध्य भारतात (महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड) लागवडीसाठी प्रसारित.

दाणे टपोरे आणि लाल.

१०० दाण्यांचे वजन : १०.७५ ग्रॅम.

मर, वांझ, फायटोप्थोरा करपा तसेच पानांवरील सर्कोस्पोरा ठिपके या रोगांना मध्यम प्रतिकारक.

परिपक्वता कालावधी : १७४ ते १७८ दिवस.

हेक्टरी उत्पादन : सरासरी १९ ते २० क्विंटल.

डॉ. विजयकुमार गावंडे, ९८२२७ ५५७७५, (वरिष्ठ शास्त्रज्ञ, कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com