Canal Overflow: येलदरी-सिद्धेश्वर धरणाच्या कालव्यात काडी-कचरा अडकल्यामुळे पाणी तुंबले. कालवा ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. पाण्याच्या प्रवाहामुळे कालव्याचे तसेच सुरवाडी (ता. पूर्णा) शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे..पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येलदरी-सिद्धेश्वर धरणाच्या सुरवाडी-माटेगाव वितरिकेच्या पुलाखाली केरकचरा साचल्याने बुधवारी (ता. १८) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कालवा ओव्हरफ्लो झाला. .Crop Damage Compensation: पीक नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा; आमदार दिलीप बनकर यांची मागणी.त्यानंतर तब्बल ८ ते १० तास पाणी शेतातून वाहिले. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर पाण्याची वहन क्षमता कमी करण्यात आली..Crop Damage Compensation Demands: पावसाअभावी बाधित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : आमदार सतीश चव्हाण.येलदरी-सिद्धेश्वर धरणातून रब्बी हंगामात तीन सिंचन आवर्तने मंजूर करण्यात आली आहेत. रविवारी (ता. १५) लासिना कालवा शाखा क्र. १ ला सुमारे ३५० क्यूसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले होते. .परिसरातील शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने यंत्राच्या साहाय्याने पुलाखाली अडकलेला काडी-कचरा काढला. कालव्याचा प्रवाह पूर्ववत करण्यात आला. कालव्याच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.