Onion
OnionAgrowon

Onion Rate : कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Onion Market : कांदा पिकासाठी यंदा बियाणे, रोप लागवडीपासून, काढणीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही, अशी स्थिती कमी दरांमुळे झाली आहे. पीक परवडत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेतच आहे.

Dhule News : कांदा पिकासाठी यंदा बियाणे, रोप लागवडीपासून, काढणीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही, अशी स्थिती कमी दरांमुळे झाली आहे. पीक परवडत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेतच आहे. दरात गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण धुळे जिल्ह्यातील बाजारात दिसत आहे. किमान ७०० व कमाल १२०० ते १७०० रुपये व सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

उन्हाळ कांदा रोपांमध्ये अनेकांची फसवणूक झाली. त्यात मध्यंतरी म्हणजेच डिसेंबर, जानेवारीत पूर्वमोसमी पाऊस झाला. प्रतिकूल वातावरणामुळे पिकाची हवी तशी वाढ झाली नाही. फवारणी, खते, तणनियंत्रण हा खर्च अधिक आला. या तुलनेत कांदा दर कमी आहे. दरवर्षी धुळे जिल्ह्यात कांद्याची लागवड स्थिर असते.

Onion
Onion Market: बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता

उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन काढणे गरजेचे आहे. मात्र हल्ली उत्पादन खर्च हा वाढत आहे. पूर्वी १५ते २० रुपये किलो कांदा गेला तरी शेतकऱ्यांना परवडत होते. आता हा दर परवडत नाही. उत्पादन खर्च वाढल्याने एका दृष्टचक्रात कांदा पीक सापडले आहे. उन्हाळ कांदा बियाण्यांचा मोठा तुटवडा होता.

Onion
Onion Rate: कांदा, कापूस, सोयाबीन धोरण भोवले

त्याचा गैरफायदा काही भामट्यांनी घेतला. तब्बल ५ हजार रुपये प्रतिकिलो दरात शेतकऱ्यांनी कांदा बियाणे घेतले. पण बियाणे हवे तसे उगवले नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. पिकाला कांदे हवे तसे वाढले नाहीत. कांदा दर सध्या प्रतिक्विंटल ७०० ते १२००, १७०० रुपये एवढे आहेत. त्यात घसरण सुरूच आहे. कांद्याला किमान २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर हवा आहे. शासकीय खरेदीची मागणी केली जात आहे. पिंपळनेर, धुळे, साक्रीत कांद्याची आवक वाढत आहे.

कांदा बाजारपेठेसाठी खुली निर्यात महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाजारपेठेतील बाजारभाव दररोज अपडेट मोबाइलवर मेसेज करून निर्यातीकडे लक्ष द्यावे. भाव घसरणार नाही. याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी आहे. स्थानिक बाजारपेठ यासाठी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. म्हसदी, देऊर, नेर, कुसुंबासह मोराणे प्र.ल. येथे थेट ओपन ट्रॉली कांदा खरेदी करायला सुरुवात झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com