Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: ज्वारी दर दबावात; आले-मका दर स्थिर, दोडक्याचे दर घटले तर, काकडीच्या दराला उठाव

Daily Commodity Rates: आज आपण आले, मका, ज्वारी, दोडका आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

आले दर स्थिर

राज्यातील बाजारात आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत. आल्याच्या भावात काही वेळा चढ उतारही दिसून आले होते. आले लागडीसाठी बियाण्याची मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली होती. पण बियाणे मागणी पूर्ण झाल्यानंतर दर पुन्हा काहीसे कमी झाले होते. सध्या आल्याला २५०० ते ३ हजार रुपये भाव मिळत आहे. पुढील काही आठवडे बाजारातील आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. सणांची मागणी येईपर्यंत आल्याच्या दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात, अशी माहिती अभ्यासकांनी दिली. 

मका दर टिकून

मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. बाजारातील मक्याची आवक सध्या कमी झाली. मात्र, यंदा मक्याचे उत्पादन वाढले आहे. तसेच वाढलेल्या दरात आयात वाढण्याचाही धोका आहे. मक्याचा स्टाॅकही आहे. त्यामुळे मक्याचे भाव स्थिर आहेत. सध्या देशात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. चालू खरिपातही मक्याची लगावड वाढण्याचा अंदाज आहे. मात्र दुसरीकडे मक्याला इथेनाॅलसाठी चांगली मागणी आहे. यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात २०० ते ३०० रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ज्वारीचे दर दबावातच

ज्वारीचे उत्पादन चांगले झाल्याने दरावर दबाव असल्याचे दिसत आहे. रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर दरावर दबाव वाढला होता. दरपातळी २०० ते ३०० रुपयांनी कमी झाली होती. ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे. ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल २६०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. ज्वारीची बाजारातील आवक सध्या कमी झाली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ज्वारीची आवक कमी होण्याची शक्यात आहे. त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

दोडका आवक घटली

बाजारीत दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. तर दोडक्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली. दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. दोडक्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

काकडीला उठाव

राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यापासून काकडीची आवक कमी होत आहे. तर दुसरीकडे काकडीला उठावही मिळत आहे. पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे काकडीच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बाजारातील आवक मर्यादीत असल्याने सध्या काकडी १८०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकली जात आहे. बाजारातील काकडीची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काकडीचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT