
Hingoli News: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळद दरात घसरण सुरू आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांनी घसरण होऊन सोमवारी (ता. ३०) हळदीची २१०० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान १०५०० ते कमाल १२५०० रुपये तर सरासरी ११५०० रुपये दर मिळाले.
बाजारात सोमवार (ता. २३) ते सोमवार (ता. ३०) या कालावधीत हळदीची प्रतिदिन १४२८ ते २१०० क्विंटलनुसार एकूण ७ हजार ३७५ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रति क्विंटल १०२५० ते १३००० रुपये दर मिळाले.
यंदाच्या एप्रिल पासून जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत कमाल प्रतिक्विंटल १३ हजार रुपयांपर्यंत दर मिळाले. परंतु त्यानंतरच्या पंधरवड्यात मात्र क्विंटलमागे ३०० ते ७५० रुपयांनी घसरण होत आहे. दर दबावात असल्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने हळद साठवून ठेवलेले शेतकरी चिंतित झाले आहेत.
हळद आवक क्विंटलमध्ये, दर रुपयांत
तारीख...आवक...किमान...कमाल...सरासरी
ता.२३...२१००...११०००...१३०००...१२०००
ता.२४...१८२५...१०६००...१२९५०...११७७५
ता.२६...१५८०...१०२५०...१२२५०...११२५०
ता.२७...१८७०...१०६००...१२६००...११६००
सोयाबीन सरासरी ४०३८ रुपये
हिंगोली धान्य बाजारात सोमवारी (ता. ३०) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ३८०० ते कमाल ४३७० रुपये तर सरासरी ४०३८ रुपये दर मिळाले. हरभऱ्याची ३०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५५९० रुपये तर सरासरी ५३२० रुपये दर मिळाले. ज्वारीची ८० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान १८४० ते कमाल २३४०रुपये तर सरासरी २०९० रुपये दर मिळाले. गव्हाची ६० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान २४४० ते कमाल २९४५ रुपये तर सरासरी २६९२ रुपये दर मिळाले, असे धान्य बाजारातील सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.