Agrowon Podcast: हिरवी मिरची व पेरू तेजीत; शेवग्याला चांगला उठाव, बटाटा व गहू बाजार स्थिर

Daily Commodity Rates: आज आपण शेवगा, बटाटा, गहू, हिरवी मिरची आणि पेरू बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market Products
Agriculture Market ProductsAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

शेवग्याला चांगला उठाव

बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे. त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीतच आहेत. शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत आहेत. शेवगा आजही ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला गेला. शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे. तर मागणीह टिकून राहील. त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

बटाट्याचा बाजार स्थिरावला

देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले झाले. देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे. परिणामी बटाट्याचे दर दबावातच आहेत. बटाट्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Agriculture Market Products
Agriculture Commodity Market : राज्य सरकारकडून हेजिंग डेस्क स्थापनेची घोषणा

गव्हाचे बाजार स्थिर

देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेले स्टाॅक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावले आहेत. बाजारातील गव्हाची आवकही कमी होत आहे. गव्हाचे भाव मागील महिनाभरात जवळपास २०० रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या गहू २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार आहे. मात्र पुढील महिनाभरानंतर सणांची मागणी सुरु होईल. त्यामुळे गव्हाला उठाव राही. या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market Products
US-India Trade : अमेरिका भारतावर कुरघोडी करणार का?

हिरवी मिरची तेजीतच

राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत. सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

पेरू तेजीत

बाजारातील पेरुची आवक मागील ३ आठवड्यांपासून मर्यादीत दिसत आहे. पावसामुळे पेरुला उठावही कमी आहे. मात्र आवक नगण्य पातळीवर होत असल्याने पेरूचे भाव तेजीत आहेत. पावसामुळे पेरु पिकाला राज्यातील बहुतांशी भागात फटका बसला. त्यामुळे माल कमी निघत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या पेरू ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. पेरुची बाजारातील आवक आणखी आठवडे कमीच राहणार आहे. दुसरीकडे पावसामुळे मागणीही मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात फार मोठ्या चढ उताराची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com