Sugarcane Crop Kolhapur : कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ, ऊस पिकाचे मोठे नुकसान

Sugarcane Crop : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील उमगाव, झांबरे येथील शिवारात हत्ती व हत्तीच्या पिल्लांनी ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
Sugarcane Crop Kolhapur
Sugarcane Crop Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur Suagrcane Season : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील उमगाव, झांबरे येथील शिवारात हत्ती व हत्तीच्या पिल्लांनी ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन हंगामात हत्तीचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील दोन दिवसांपासून हत्तीने शेतकऱ्यांची झोप उडवलली आहे. वनविभागाने या हत्तींना जंगलात कितीही पिटाळून लावले तरी पुन्हा ते अन्नाच्या शोधात पिकावर ताव मारत असल्याने वनविभागाचे कर्मचारीही हतबल झाले आहेत.

झांबरे-उमगाव येथील शिवारात हत्तीसोबत एक लहान पिल्लू यांनी सुमारे २ ट्रक ऊस पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी धास्तावला आहे. वनविभागाने तातडीने या हत्तींना जंगलात पिटाळून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अजित बांदेकर यांनी केले.

Sugarcane Crop Kolhapur
Kolhapur Sugarcane Season : कोल्हापुरात ऊस दरावरून शेतकरी संघटना आक्रमक, शिरोळ तालुक्यातील ऊसतोडी पाडल्या बंद

गेल्या पाच-सहा दिवसांपासून हत्ती सिंधुदुर्ग हद्दीतून सडेगुडवळे, पिळणी येथील शिवारातून झांबरे, उमगाव येथे दाखल झाला आहे. ऐन ऊस तोडणीच्या हंगामात हत्तीचा कळप दाखल झाल्याने भुईमूग, रताळी, भात, नाचणी कापणी, मळणीची कामे लांबणीवर पडत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

दरम्यान वनपाल कृष्णा डेळेकर, वनरक्षक आकाश मानवतकर, सागर कोळी, मौला मुबारक सनदी, वनमजूर गुंडू देवळी, बुधाजी कांबळे, नितीन नाईक, सचिन कांबळे, विक्रम सावंत, ज्ञानेश्वर गावडे, आदी समवेत पीक नुकसानीची पाहणी व पंचनामा केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com