Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मक्यात काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन, मका, तसेच काय आहे तूर दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, आले आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

कापूस वायदे नरमले

कापसाचा बाजार दबावातच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची विक्री वाढल्याचा दबाव दरावर आला आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६९.२२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही जुलैचे वायदे ५५ हजार ३२० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन बाजार दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायद्यांनी पुन्हा गेल्या ४ वर्षातील निकांची पातळी गाठली. सोयाबीनचे वायदे आज दुपारी १०.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनला आजही ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात सोयापेंडचे भाव ४० हजार रुपये प्रतिटनांवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीचा बाजार चढा

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

आल्यातील चढ उतार कायम

आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.     

मक्यात काहीशी नरमाई 

मक्याच्या बाजारात मागील ५ दिवसांपसासून काहीशी नरमाई आली. मक्याचा भाव अनेक बाजारांमध्ये १०० ते १५०० रुपयांपर्यंत कमी झाला आहे. तसेच एनसीडीईएक्सच्या डिलिव्हरी केंद्रावरही भाव काहीसा कमी झाला. सध्या मक्याला सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केद्रांवर मका २८८० रुपयांनी विकला जात आहे. मक्याच्या भावात काहीशे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT