Cotton Market Rate : कापूस उत्पादनाचा अंदाज १५ लाख गाठींनी वाढवला; भावपातळी मात्र कायम राहणार

Cotton Association of India : देशातील कापूस उत्पादन २९४ लाख गाठी नाही तर ३०९ लाख गाठी झाल्याचं सीएआयनं म्हटलं. पण उत्पादनाचा अंदाज जेवढा वाढवला तेवढाच अंदाज वापर आणि निर्यातीचा वाढवला
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Pune News : काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने पुन्हा एकदा घोळ घातला. सीएआयने आज एक अहवाल प्रसिध्द केला. या अहवालात देशातील कापूस उत्पादन २९४ लाख गाठी नाही तर ३०९ लाख गाठी झाल्याचं सीएआयनं म्हटलं. पण उत्पादनाचा अंदाज जेवढा वाढवला तेवढाच अंदाज वापर आणि निर्यातीचा वाढवला. त्यामुळे बाजारातील समिकरण कायम राहू शकते. पुढच्या दोन आठवड्यात कापसाचा भाव ७ हजार ७०० ते ८ हजारांच्या पातळीभोवती राहू शकतो. तर मे महिन्यापर्यंत भावात आणखी ५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.

सीएआयचा अहवाल

सीएआयने आपल्या आजच्या अहवालात फेब्रुवारीच्या तुलनेत देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज जवळपास १५ लाख गाठींनी वाढवला. पण एवढ्याच जास्त कापसाची निर्यात आणि देशातील वापर वापर होणार आहे. आधी सीएआय १४ लाख गाठींची निर्यात होईल असं म्हणत होतं. पण आजच्या अहवालात निर्यात २२ लाख गाठींवर पोचेल, असे म्हटले आहे. म्हणजेच निर्यातीचा अंदाज ८ लाख गाठींनी वाढवला. विशेष म्हणजे देशातून २९ फेब्रुवारीपर्यंत १५ लाख गाठी कापूस निर्यात झाल्याचेही सीएआयने स्पष्ट केले. 

सीएआयचं नेमकं म्हणणं काय?

दुसरं म्हणजे देशातील कापूस वापराचा अंदाजही ६ लाख गाठींनी वाढवन ३१७ लाख गाठींवर नेला. विशेष म्हणजे कापसाची आयात कमी होईल, असे म्हटले आहे. आधी सीएआय म्हणतं होतं की २२ लाख गाठी आयात होतील. पण आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने समिकरण बदललं. आता आयात २० लाख गाठीच होती, असा अंदाज आहे. म्हणजेच आता आयात कमी आणि निर्यात जास्त असं समिकरण असणार आहे. विशेष म्हणजे शेवटचा शिल्लक स्टाॅक म्हणजेच कॅरिओव्हर स्टाॅक हा तेवढाच, २० लाख गाठी राहणार आहे. 

सर्वाधिक स्टाॅक सीसीआयकडे

देशातील बाजारात २९ फेब्रुवारीपर्यंतच २२६ लाख गाठींची आवक झाली होती, असे सीएआयने स्पष्ट केले. तर सीसीआयकडे सर्वाधिक ३३ लाख गाठी कापूस आहे. म्हणजेच सर्वाधिक स्टाॅक सीसीआयकडे आहे. सीसीआय आपला कापूस देशातील बाजारभावाप्रमाणे सध्या उद्योगांना देत आहे. तर बाजारभावाला निर्यातीमुळे चांगाल सपोर्ट आहे. उद्योग कमी भावातही कापूस मागू शकत नाहीत, कारण सध्या जगात आपला कापूस स्वस्त आहे. 

शिल्लक स्टाॅक

थोडक्यात काय तर, उत्पादनाचा अंदाज जेवढा वाढवला तेवढाच अंदाज वापर आणि निर्यातीचा वाढवला. त्यामुळे शिल्लक स्टाॅक मोठ्या प्रमाणात राहील आणि बाजार कोसळेल, अशी परिस्थिती नाही. बाजारातील समिकरण कायम राहू शकते. पुढच्या दोन आठवड्यात कापसाचा भाव ७ हजार ७०० ते ८ हजारांच्या पातळीभोवती राहू शकतो. तर मे महिन्यापर्यंत भावात आणखी ५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com