Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार दबावातच ; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत टोमॅटो दर ?

Market Update : आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, कांदा आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

कापूस वायदे नरमले

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वायदे पुन्हा नरमले होते. कापसाचे वायदे आजही ४ वर्षातील निचांकी पातळीवर कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ६८.१३ सेंट प्रतिपाऊंडवर आले. देशातील बाजारातही जुलैचे वायदे ५५ हजार ३२० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन बाजार दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.९८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनला आजही ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कांदा बाजार स्थिरावला; कापूस, सोयाबीन, हरभरा, तसेच कारले दर काय आहेत?

टोमॅटोचा बाजार तेजीतच

बाजारातील टोमॅटोची आवक गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत आहेत. तर दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे. यामुळे टोमॅटोचा भाव टिकून आहे. टोमॅटोला बाजारात सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

Agriculture Market
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, कांदा दर

कांदा भाव स्थिरावले

कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे. कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पुर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे. बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली. पण कांद्याचा उठाव कायम आहे. त्यामुळे कांद्याला आज सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

मक्याचे भाव तेजीतच

देशातील बाजारात मक्याचा भाव टिकून आहे. देशात यंदा मक्याला चांगला उठाव आहे. इथेनाॅल उद्योग यंदा मक्याचा वापर वाढविणार आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा काहीसा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मक्याचा भाव टिकून आहे. मक्याला सध्या सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळाला. एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रावर २ हजार ९९८ रुपये भाव मिळाला. मक्याचा भाव तेजीतच राहतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com