Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हरभरा दरात नरमाई; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे मका दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, मका आणि कारली पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत तर सोयापेंडच्या भावात नरमाई दिसून आली. सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये ९.९३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव कमी होऊन वायदे ३०१ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसाचे भाव स्थिर

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६९.८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज काहीसे कमी झाले होते. देशातील वायद्यांमध्ये कापूस कमी होऊन ५५ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होता. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याचे भाव टिकून

सणामुळे कांद्याला चांगला उठाव आहे. पण राज्यातील बाजारात कांद्याची आवक कमी आहे. तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव टिकून आहेत. सध्या कांद्याला बाजारात प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तर खरिप कांद्याची बाजारातील आवक काहिशी लांबली आहे. त्यामुळे कांद्याची उपलब्धता कमी आहे. परिणामी कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

हरभरा दरात नरमाई

देशातील बाजारात हरभरा दरात नरमाई दिसून आली. हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झाले, असे व्यापारी सांगत आहेत. हरभरा भावावर पिवळा वाटाणा आयातीचा परिणाम होत आहे. पिवळा वाटाणा स्वस्त असल्याने हरभरा भावही कमी होण्याला मदत झाली. देशातील बाजारात हरभरा भाव सध्या ६ हजार २०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

कारल्याला चांगला उठाव

राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. बाजारातील कारल्याची आवक कमी आहे. बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचाही आधार कारल्याला मिळत आहे. कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याला भावही चांगला आहे. सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. कारल्याची आवक यापुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

मक्याचा बाजार स्थिर

खरिपातील मक्याची आवक सुरु झाल्यानंतर मक्याच्या भावात नरमाई आली होती. पण मागील दोन आठवड्यांपासून मक्याचा बाजारभाव काहिसा स्थिरावला आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सध्या बाजारभावात तफावत दिसून येत आहे. राज्यातील बाजारात मक्याला गुणवत्ता आणि ओलाव्यानुसार १ हजार ८०० ते २ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचा बाजार यंदा टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT