Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा भावात काहीशी सुधारणा

Market Bulletin : देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा झालेली दिसते. पण सध्याची झालेली सुधारणा शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या भावापेक्षा कमीच आहे.

Anil Jadhao 

1. देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनची भावपातळी सध्या ५ हजार रुपयांपेक्षा कमीच आहे. सध्या बाजारात सोयाबीनला गुणवत्तेप्रमाणे अगदी ४ हजार २०० रुपयांपासून भाव मिळत आहे. सध्या बाजारातील नव्या मालाची आवक वाढताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या दरातील चढ उतार कायम आहेत. देशातील बाजारात पुढील काही दिवसात सोयाबीन भाव स्थिरावतील, असा अंदाज अभ्यासकांनी  व्यक्त केला. 

   
2. कापसाच्या भावात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. वायद्यांमध्येही भाव कमी जास्त होत आहेत. वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कापूस ५०० रुपयाने वाढून ५९ हजार १६० रुपयांवर पोचला होता. पण बाजार समित्यांमध्ये भाव कमीच दिसतात. बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ३०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाचे भाव पुढील काही दिवसांमध्ये पूर्वपदावर येतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

3. हिरव्या मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीचा उठाव कायम आहे. यामुळे दराला आधार मिळत आहे. सध्या हिरवी मिरची प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार रुपयाने विकली जात आहे. हिरव्या मिरचीची बाजारातील आवक पुढील काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

4. वांग्याला सध्या चांगला उठाव आहे. बाजारातील आवक मात्र स्थिर दिसते. वाढत्या उष्णतेचा वांगी पिकाला फटका बसतो, असे शेतकरी सांगत आहेत. यामुळे आवकेवर परिणाम झाला. सध्या वांगीचे व्यवहार २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत. वांगी आवक आणखी काही काळ स्थिर राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

5. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा झालेली दिसते. पण सध्याची झालेली सुधारणा शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या भावापेक्षा कमीच आहे. सरकारी धोरणांचा बाजारावर दबाव असल्याने दरातील वाढ धीम्या गतीने सुरु आहे, असे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारातील कांदा आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे सध्या असलेल्या भावापेक्षा दर जास्त असायला हवे होते. पण सरकारी धोरणांच्या दबाव काहीसा कायम आहे.

बाजारात कांदा सध्या १ हजार ७०० ते २ हजार ३०० रुपये दराने विकला जात आहे. सरकारने अद्यापही कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क काढले नाही. तसेच ऐन सणासुदीच्या काळात सरकार कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे. पण सध्या देशात उन्हाळ कांद्याची उपलब्धता कमी आहे. तर खरिपातील लागवडीही यंदा घटलेल्या आहेत. त्यातच कमी पावसाचा फटकाही पिकाला बसत आहे. परिणामी पुढील काळात बाजारातील कांदा आवक हळूहळू कमी होत जाईल. यामुळे कांद्याचे भावही सुधारू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT