Moong Market
Moong Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Moong Rate : मुगाचे दर सुधारण्याची शक्यता !

टीम ॲग्रोवन

सोयाबीनचे दर स्थिरावलेलेच

1. अमेरिकेतील सोयाबीन हंगामही आता तोंडावर आलाय. येथील शेतकऱ्यांनी आणि निर्यातदार कंपन्यांनी सोयाबीनचे सौदे सुरु केले आहेत. चीनने अमेरिकेतून दीड लाख टन सोयाबीन आयातीचे करार पूर्ण केले. पुढील काळात चीन आणखी सौदे करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील वायदे बाजारात सोयाबीनने आज १४.६५ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला होता. तर देशातील बाजारात सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये सरासरी दर मिळाला. यंदाच्या हंगामात सोयाबीनचा हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

वांगी दरातील तेजी कायम

2. बाजारात वांग्याचे दर सध्या वाढलेलेच आहेत. सततचा पाऊस आणि कीड-रोगामुळं वाग्याची आवक मर्यादीत होतेय. राज्यातील मुंबई बाजार समितीत वांग्याची ७०० ते १ हजार क्विंटल आवक होतेय. तर पुणे आणि नागपूर बाजारातील आवक सरासरी ३०० क्विंटलवर आहे. मात्र इतर बाजार समित्यांमधील आवक ही ५० क्विंटलपेक्षा कमी आहे. मात्र वांग्याची मागणी टिकून आहे. त्यामुळं वांग्याला चांगला दर मिळतोय. सध्या वांग्याला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

तुरीच्या दरात पुन्हा सुधारणा

3. सणांचा काळ सुरु झाल्यानंतर तुरीच्या दरातील तेजीही पुन्हा सुरु झालीये. सध्या देशात तुरीची मोठी टंचाई जाणवत आहे. तसंच व्यापारी आणि सरकारकडील तुरीचा साठा नगण्य आहे. दरात आणखी वाढ होईल, ही शक्यता गृहीत धरून स्टाॅकिस्टही तूर बाजारात आणण्यास इच्छूक दिसत नाहीत. मागील आठवडाभरात तुरीच्या दरात पुन्हा क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांची सुधारणा दिसून आली. सध्या तुरीला सरासरी ७ हजार ते ७ हजार ८०० रुपयांचा दर मिळतोय. यंदाच्या हंगामात तूर चांगलीच भाव खाण्याची शक्यता व्यक्त होतेय.

हिरव्या मिरचीचे दर टिकून

4. हिरव्या मिरचीचे दर मागील महिनाभरापासून टिकून आहेत. तसंच आवकेतही मोठी वाढ झालेली दिसून येत नाही. अनेक भागांमध्ये सततच्या पावसानं मिरची पिकाचं नुकसान होतंय. तर काही ठिकाणी मिरची तोडणीच्या कामात व्यत्यय येतोय. त्यामुळं बाजारातील आवक मर्यादीत होतेय. महत्वाच्या बाजार समित्या वगळता सरासरी आवक ही ४० क्विंटलपेक्षा कमीच दिसतेय. तर सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हिरव्या मिरचीला पुढील काळातही हा दर मिळेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

मुगाचे दर सुधारण्याची शक्यता !

5. देशातील बाजारात मुगाचे दर (Moong Rate) नरमलेले आहेत. खरिपातील मुगाची आवक (Kharif Moong Arrival) अनेक बाजारांमध्ये सुरु झाली. मात्र नव्या मालात ओलावा अधिक आहे. त्यामुळं या मुगाला सध्या हमीभावापेक्षा (Moong MSP Rate) कमी दर मिळतोय. ताज्या आकडेवारीनुसार यंदाच्या खरिपात देशात मुगाची लागवड (Moong Cultivation) ४ टक्क्यांनी कमी झाली. आत्तापर्यंत ३३ लाख हेक्टरवर मुगाचा पेरा झालाय. पण केवळ पेराच कमी झाला नाही. तर पाऊस आणि कीड-रोगाचाही पिकावर परिणाम होतोय. तसचं मागील काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागांत पडलेल्या पावसामुळं काढणीला आलेल्या मुगाचं नुकसान होतंय. देशाच्या महत्वाच्या मूग उत्पादक पट्ट्यात काढणी सुरु झालीये. बाजारातही मुगाची आवक वाढतेय. मात्र सध्या आवकेचं प्रमाण कमीच आहे. मुगाची आवक वाढल्यास दरावर दबाव येऊ शकतो, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

यंदा केंद्र सरकारनं मुगाला प्रतिक्विंटल ७ हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर केलाय. मात्र सध्या बाजारात ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयाने मुगाचे व्यवहार होत आहेत. सध्या आवक होणाऱ्या मालापैकी तब्बल ७० टक्क्यांपर्यंतची खरेदी स्टाॅकिस्ट करत असल्याचं दिसतंय. व्यापाऱ्यांच्या मते दाल मिल्सकडे मागील हंगामातील मुगाचा साठा नगण्य आहे. तर केंद्राकडील बफर स्टाॅकही कमी आहे. त्यामुळं सणांच्या काळात मागणी वाढून दरही वाढण्याची शक्यता आहे. सणांच्या काळात मागणी वाढल्यास मुगाचे दर क्विंटलमागं एक हजार रुपयांपर्यंत सुधारू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT