Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याचा बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे हरभरा दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हरभरा आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज काहिशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये ९.८३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या भावाताली चढ उतार असून वायदे ३०२ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात नरमाई

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत काहिशी सुधारणा झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा परिणाम भावावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे शुक्रवारी ७०.६६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज काहीसे कमी झाले होते. देशातील वायद्यांमध्ये कापूस कमी होऊन ५५ हजार ९०० रुपये प्रतिखंडीवर होता. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्याचे भाव टिकून

राज्यातील बाजारात कांद्याची आवक कमी आहे. तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव टिकून आहेत. सध्या कांद्याला बाजारात प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तर खरिप कांद्याची बाजारातील आवक काहिशी लांबली आहे. त्यामुळे कांद्याची उपलब्धता कमी आहे. परिणामी कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

हरभरा दरात नरमाई

देशातील बाजारात हरभरा दरात नरमाई दिसून आली. हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झाले, असे व्यापारी सांगत आहेत. हरभरा भावावर पिवळा वाटाणा आयातीचा परिणाम होत आहे. पिवळा वाटाणा स्वस्त असल्याने हरभरा भावही कमी होण्याला मदत झाली. देशातील बाजारात हरभरा भाव सध्या ६ हजार २०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

गव्हाचे भाव टिकून

देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. गव्हाला सध्या सणांची मागणी आहे. गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते. तसेच सरकारडे गव्हाचा स्टाॅक कमी आहे. बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे. त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर आहेत. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. ऐन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

Drought Relief Planning: दुष्काळ निवारणाचे सूक्ष्म नियोजन करू : फडणवीस

Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन

Sweet Potato Demand: रताळ्यांच्या मागणीत वाढ

Maharashtra Drought: काळीज पिळवटून टाकणारा दुष्काळ

SCROLL FOR NEXT