Agriculture Market : इजिप्त, तुर्कीचा किरकोळ कांदा दुबईमार्गे भारतात

Onion Market : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली आहे. अत्यंत कमी प्रमाणात नवीन खरीप कांदा बाजारात येत आहे.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली आहे. अत्यंत कमी प्रमाणात नवीन खरीप कांदा बाजारात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने कांद्याचे दर टिकून आहेत. त्यातच गेल्या पंधरवड्यात पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, देशात दुबईमार्गे इजिप्त व तुर्कीमधील कांदा भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासह कांदा उपलब्धतेसाठी भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन संस्थांच्या माध्यमातून पावणेपाच लाख टन कांदा खरेदी केली गेली. एकीकडे हा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येत आहे, असे असताना कांदा आयातीला परवानगी दिल्याने केंद्र सरकारच्या धोरणावर टीका होत आहे.

Onion
Onion Rate : कांद्याचे दर गडगडल्यामुळे बेळगाव बाजारसमितीत शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

ग्राहकांना कांदा स्वस्त दरात मिळण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी वाणिज्य, ग्राहक व्यवहार व अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून वेळोवेळी हस्तक्षेप केला आहे. त्यातच कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तान पाठोपाठ आता इजिप्त व तुर्कीमधून ५ कंटेनर कांदा भारतात दाखल झाला आहे.

Onion
Onion Nursery Damage : कांदा रोपवाटिकांची मोठी हानी

दुसऱ्यांदा आयात; मात्र दराचा ताळमेळ बसेना

पहिल्यांदा २४ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानातील ३०० टन कांदा ११ ट्रकमधून रस्तामार्गे पंजाब राज्यातील अमृतसर व जालंदर या शहरांमध्ये दाखल झाला होता. आता दुसऱ्यांदा ईजिप्त व तुर्कीमधून १२० टन कांदा दाखल झाला आहे. पुण्यात २, बंगळूर २ व मुंबई १ कंटेनर कांदा पाठविण्यात आला आहे.

बंदरावर उतरल्यानंतर त्याची आयात किंमत ३२ ते ३४ रुपये किलो होती. हा कांदा विक्रेत्यांना पोहोच होईपर्यंत त्यांची किंमत प्रतिकिलो ४२ रुपयांपर्यंत गेला, मात्र किरकोळ विक्री ३५ ते ३८ रुपये दरम्यान झाली. त्यामुळे आयातदाराला किलोमागे ३ ते ४ रुपये तोटा झाला. एकंदरीत आयात झालेल्या कांद्याच्या आयातीची बाजारातील परिस्थिती अनुकूल नाही. गुणवत्ता व दरात ताळमेळ बसत नसल्याने आयात होऊनही हा कांदा फायद्यात नसल्याचे हॉर्टिकल्चर प्रोड्यूसर एक्स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com