Kabuli Chana Market Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Kabuli Chana Market: काबुली हरभरा तेजीत राहणार ?

देशात यंदा काबुली हरभरा उत्पादन वाढीचा अंदाज

Anil Jadhao 

कापसाच्या दरात काहीशी वाढ

कापसाचे दर (Cotton Rate) देशातील बाजारात आजही काही ठिकाणी वाढले होते. आज दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा पाहयाल मिळाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दर आज (Cotton futures) काहीसे वाढले होते.

देशातील बाजारात आज कापसाला सरासरी (cotton Bajarbhav) ८ हजार ३०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. कापसाचे भाव पुढील काही दिवस सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.(Kabuli Chana Market Rate)

सोयाबीनचा बाजार आजही स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) चढ -उतार पाहायला मिळत आहेत. काल दर (Soybean bajarbhav) काहीसे कमी  झाल्यानंतर आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली.

देशातील बाजारात मात्र सोयाबीन दराची (Soybean market) पातळी आजही कायम होती. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. जानेवारीत सोयाबीन दरात आणखी काही वाढ होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

गवार खातेय चांगला भाव

राज्यातील बाजारात सध्या गवारची आवक घटली आहे. त्यामुळं गवारीला दरही चांगला मिळतोय. महत्वाची शहरं वगळता बाजारातली आवक २० क्विंटलपेक्षाही कमी आहे. मात्र मागणी चांगली आहे. त्यामुळं गवारीला सध्या सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपये क्विंटल दर मिळतोय. पुढील काही दिवस गवारचे हे दर कायम राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

भोपळ्याचे दर तेजीत
बाजारात सध्या भोपळ्याला चांगला भाव मिळतोय. भोपळ्याची आवक सध्या कमी आहे. मात्र उठाव चांगला मिळतोय. पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर या बाजार समित्या वगळत्या भोपळ्याची आवक १० क्विंटलपेक्षाही कमी आहे. त्यामुळं भोपळ्याला सरासरी १००० ते १२०० रुपये दर मिळतोय. भोपळ्याचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकातात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

काबुली हरभरा तेजीत राहणार ?

देशात मागील वर्षभर हरभरा दर दबावात आहेत. मात्र काबुली हरभऱ्याची टंचाई असल्याने दर तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याला मागणी चांगली आहे. पण काबुली हरभरा दर १३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे गेल्यानं नफावसुली सुरु झाली.

१० हजार रुपयांच्या खाली खरेदी केलेला माल स्टाॅकिस्टनी या दरात बाजारात आणण्यास सुरुवात केली. त्यामुळं मागील १० दिवसांमध्ये बाजारातील काबुली हरभरा विक्री अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात वाढली. तर वाढलेल्या दरात निर्यातमागणी काहीशी कमी झाली होती. परिणामी काबुली हरभरा दरात क्विंटलमागं एक हजार रुपयांपर्यंत कमी झाले होते.

पण आता दर कमी झाल्यानंतर आखाती देश आणि इतर काही देशांकडून काबुली हरभऱ्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. तर देशातील नवा काबुली हरभरा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

म्हणजेच अजून दोन महिन्यांचा कालावधी लागेल. पण उद्योगाच्या मते यंदा देशातील काबुली हरभरा उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं स्टाॅकिस्ट त्याआधीच बाजारात माल आणण्याची शक्यता आहे.

तरी पुढील काळात काबुली हरभरा १२ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जाईल. पण बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर दरावर दबाव येऊ शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Indian Oil Market: सणांमुळे खाद्यतेलाची आयात वाढणार; सोयातेलाची आयात विक्रमी पातळीवर 

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल

Farm Road Model : शेतरस्त्याचा औसा पॅटर्न आता राज्यभरात

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गात मुसळधार, तरीही सरासरीपेक्षा कमीच

Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

SCROLL FOR NEXT