Onion Market : इंडोनेशियाकडून भारतीय कांद्याचा आयातीसाठी कोटा वाढता

जागतिक स्तरावर उत्कृष्ट शेती व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या देशाकडून शेतीमाल आयात करण्यास इंडोनेशिया सरकार अनुकूल आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

नाशिक : जागतिक पातळीवर कांदा उत्पादनात (Onion Production) चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो; मात्र धोरणांच्या धरसोडीमुळे निर्यात (Onion Export) मंदावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे; मात्र या अडचणीच्या काळात चव, औषधी गुणधर्म, आकार, रंग यासह उत्कृष्ट पीक व्यवस्थापन पद्धतीमुळे पुन्हा एकदा इंडोनेशियाकडून भारतीय कांद्याने निर्यात संधी निर्माण केली आहे.

त्यामुळे आता चीनकडून कांद्याची आयात (Onion Import) कमी करून भारतीय कांद्यासाठी इंडोनेशियाकडून कोटा वाढविला जात आहे. याला ‘अपेडा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

जागतिक स्तरावर उत्कृष्ट शेती व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या देशाकडून शेतीमाल आयात करण्यास इंडोनेशिया सरकार अनुकूल आहे. याबाबत या सरकारच्या कृषी मंत्रालयाला भारतीय शेतीमाल उत्पादनसंबंधी काही समस्या होत्या; मात्र इंडोनेशिया कृषी मंत्रालयाचे शेतीमाल आयात निर्यात, ऑडिट, शेतीमाल प्रमाणिकरण विभागाचे अधिकारी नाशिक जिल्ह्यात पाहणीसाठी नुकतेच येऊन गेले.

Onion Market
Onion Rate : दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्राला विनंती

फलोत्पादन गुणवत्ता व नियंत्रण निरीक्षक तथा ग्लोबल गॅप प्रमाणिकरण उप समन्वयक डॉ. दिना मार्था, फलोत्पादन आयात व निर्यात परवाना विभागाच्या बुडी परमादी, मिरा अफिरती यांचा समावेश होता. दरम्यान या वरिष्ठ शिष्टमंडळाने भारतीय कांदा उत्पादकांच्या थेट शेतात जाऊन उत्पादन पद्धती ते निर्यात कामकाज प्रत्यक्ष अनुभवले. त्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन झाले.

गेल्या दहा वर्षांत इंडोनेशियात होणाऱ्या कांदा निर्यातीत मोठे चढ उतार दिसून आले. सरासरी वार्षिक उलाढाल ६० ते ८० कोटी दरम्यान झाल्याची स्थिती आहे. २०१३-१४ मध्ये विक्रमी ७८,७२६ टन कांद्याची निर्यात होऊन २४२.५० कोटी रुपयांची गेल्या दशकातील सर्वाधिक उलाढाल झाली होती; मात्र त्यानंतर निर्यात १०० कोटींच्या खाली आली.

Onion Market
Onion Rate : चाकणच्या बाजारात नव्या कांद्याचा हंगाम सुरू

२०१५-१६ या वर्षात १७.५५ कोटी रुपयांवर नीच्चांकी घसरण झाली होती. पुन्हा २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत पुन्हा १०० कोटींवर गेली; मात्र नंतर अस्थिरता दिसून आली; मात्र २०२०-२१ मध्ये ११२ कोटींवर उलाढाल होऊन पुन्हा ८६ कोटींवर आली होती. त्यात सुधारणा झाली असून २०२२-२३ वर्षात (ऑक्टोबरअखेर) निर्यात १२४ कोटींवर गेली. इंडोनेशियाकडून मागणी वाढत असल्याने पुन्हा २०० कोटींचा पल्ला गाठण्यास मदत होणार आहे.

यामुळे आहे भारतीय कांद्याला मागणी:

इंडोनेशियामध्ये कंदवर्गीय भाजीपाला उत्पादनात ‘शेलोट’ उत्पादन घेतले जाते. त्यास स्थानिक आहारात मागणी असते; मात्र कांद्याच्या तुलनेत महाग असते. तुलनेत भारतीय कांदा दराने कमी तसेच चव, हाताळणी, प्रक्रिया यासाठी सुलभ आहे. यापूर्वी इंडोनेशियाकडून चीन, न्यूझीलंड, पाकिस्तान, अमेरिका व भारत या देशांतून कांदा आयात होत होता; मात्र आता पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आदर्श कामकाज पाहून आयातीसाठी भारतीय कांद्याला पहिले स्थान दिले जात आहे.

‘गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस’, ‘गुड ॲग्री प्रोड्यूस हॅण्डलिंग प्रॅक्टिसेस’ या सर्व मानकांमध्ये भारतीय कांद्यासंबंधी होत असलेले कामकाज इंडोनेशिया कृषी मंत्रालयाच्या शिष्टमंडळाला भावले. यापूर्वी निर्यातदारांना कोटा देऊन त्यांच्यामार्फत ग्लोबल गॅप प्रमाणित दुसऱ्या आयातदारांकदून आयात केली जायची. आता हे होणार नाही. ग्लोबलगॅपधारक भारतीय निर्यातदारांनी नमूद केल्याप्रमाणेच आता त्यांच्याकडून खरेदी पूर्ण केली जाणार आहे. चीन मुख्य स्पर्धक होता; मात्र आता भारतीय कांदा आघाडी घेईल.

- नागपाल लोहकरे, उप महाव्यवस्थापक, अपेडा

कांदा उत्पादक शेतकरी, निर्यातदार यासह ग्लोबल गॅपधारक यांचे कामकाज समजून घेण्यात आले. भारतीय कांद्याच्या उत्पादन पद्धती या वर्षांनुवर्षे पुढे आल्या आहेत. त्यातून गुणवत्तापूर्ण कांदा उत्पादन घेतले जाते. यातून खात्री पटल्याने निर्यातदारांकडे इंडोनेशियाकडून मागणी वाढते आहे. १ लाख टनांपर्यंत निर्यात होऊ शकते.

- संदीप सोनकुळ, लीड असेसर-ग्लोबल गॅप प्रमाणिकरण

गेल्या चार वर्षांतील निर्यात व उलाढाल स्थिती :

वर्ष...निर्यात (टनांत)...उलाढाल (कोटी रुपये)

२०१९-२०...३५,५८७.८०...४९.७१

२०२०-२१...७०,७४१.११...११२.६९

२०२१-२२...३७,६६९.९७...८६.८०

२०२२-२३(एप्रिल ते ऑक्टोबर)...६९,३४७.८२...१२४.३२

(संदर्भ : अपेडा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com