Cotton Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton Rate : कापसाचा भाव कितीवर पोचला ?

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर आज जवळपास अडीच टक्क्यांनी नरमले होते. तर देशातील वायदे बाजारातही कापसाचे वायदे गाठीमागे १६० रुपयांनी कमी झाले. तर दुसरीकडे बाजारात कापसाची आकही अपेक्षेपेक्षा कमीच आहे.

टीम ॲग्रोवन

सोयाबीनचा बाजार तेजीत

1. देशातील बाजारात सोयाबीनचे दर टिकून आहेत. आजही देशातील अनेक बाजारात सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर कमाल दराने बहुतेक बाजारात ६ हजारांचा टप्पा पार केलाय. सोयाबीनचे दर वाढल्याने बाजारात आवकही वाढतेय. मात्र अनेक शेतकरी दरात आणखी वाढ होण्याची वाट पाहत आहेत. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता सोयाबीनला सरासरी ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

तूर भाव खाणार

2. देशात ऑक्टोबर महिन्यात ९५ हजार टन तुरीची आयात झाली. यापैकी तब्बल ८५ टक्के तूर आफ्रिकेतील मोझांबिक, सुदान, मालावी आणि टंझानिया या देशांमधून झाली. तर १४.५ टक्के आयात म्यानमारमधून झाली. सध्या देशातील बाजारात तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज असल्यानं सरकारने तूर आयात वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी केलाय.

मुगाचे दर वाढणार

3. देशातील बाजारात मुगाची आवक सध्या काहीशी वाढली आहे. राजस्थान हे देशातील महत्वाचं मूग उत्पादक राज्य आहे. मात्र पोत्यांच्या टंचाईने येथील सरकरी खरेदी थांबली होती. त्यामुळं बाजारात मुगाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. मात्र या दरात मुगाला मागणी वाढल्याने दर पुन्हा ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचले. केंद्रानं यंदा मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यामुळं मुगाचे दर हमीभावापेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

हिरव्या मिरचीचे दर टिकून

4. राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळतोय. सध्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारातील आवक काहीशी वाढलेली दिसते. मात्र अद्यापही बाजारावर आवकेचा दबाव नाही. त्यामुळं पुढील काही दिवस बाजारातील हिरव्या मिरचीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

कापसाचा भाव कितीवर पोचला ?

5. देशातील बाजारात आजही कापूस दरात (Cotton Rate) क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. सध्या कापसाचे दर (Cotton Market Rate) वाढले आहेत. मात्र तरीही बाजारातील आवक अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. त्यामुळे कापूस दर वाढत आहेत. देशातील बहुतांशी बाजार समित्यांमध्ये कापसाचा कमाल दर आता ९ हजारांच्या पुढे गेला. तर सरासरी दर ८ हजार ५०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र शेतकरी याही दरात कापूस विक्री करण्यास उच्छूक दिसत नाहीत, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात काहीशी नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे जवळपास अडीच टक्क्यांनी नरमले होते. कापसाचे वायदे आज ८८.३३ सेंट प्रतिपाऊंडवरून ८५.८५ सेंटवर आले होते.

नव्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढउतार सुरु आहेत. तर देशातील बाजारात नोव्हेंबरमध्ये कापूस दरात सतत सुधारणा झाली. सध्या देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाला ८ हजार ५०० ते ९ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तर वायद्यांमध्ये कापसाचे दर गाठीमागे १६० रुपयांनी नरमले होते. आज वायद्यांमध्ये गाठींचे व्यवहार ३३ हजार २२० रुपयाने पार पडले. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. वायद्यांमध्ये कापूस नरमला मात्र बाजार समित्यांमधील दर तेजीत आहेत. कापूस बाजाराचा विचार करता शेतकऱ्यांना किमान सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं बाजाराच आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT