Cotton Rate
Cotton Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast Chana Nafed: नाफेडने राज्यात किती हरभरा खरेदी केला?

Team Agrowon

१) कापसाचे दर वाढले (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय आणि देशातील वायदे बाजारात कापसाच्या दरात मोठी सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ८२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ६१ हजार ४०० रुपयांवर होते.

वायद्यांमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देशातील बाजारातही उमटली. अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव २०० ते ३०० रुपयांनी वाढले.

कापसाची सरासरी दरपातळी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपये क्विंटल दिसून आली. पुढील काळात दरात सुधारणेचा कल कायम राहू शकतो.

२) सोयाबीनच्या दरात सुधारणा (Soybean bajarbhav)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दारत सुधारणा पाहयला मिळत आहे. आज दुपापर्यंत सोयाबीनचे वायदे १४.६४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४५७ डाॅलरवर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाल्यानं देशातील प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन दरात १०० ते १५० रुपयांची वाढ केली होती. प्रमुख बाजारसमित्यांमध्ये दर १०० रुपयांनी वाढले.

सोयाबीनला आज सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये क्विंटल दर मिळाला. सोयाबीनच्या दरातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

३) हिरवी मिरची तेजीत (Green Chilli Rate)

मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस झाला. याचा परिणाम भाजीपाला पिकांवर जास्त झाला. सध्या बाजारातील हिरवी मिरचीची आवक घटली आहे. त्यामुळं हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा झाली.

सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. पुढील काही दिवस हिरव्या मिरचीची आवक मर्यादीत राहून दरातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज भाजीपाला व्यापारी व्यक्त करत आहेत.

४) लिंबाला मिळतोय उठाव (lemon Rate)

वाढता उन्हाचा चटका आणि लग्न समारंभामुळे लिंबाला मोठी मागणी वाढली. मात्र वादळी पावसामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. परिणामी बाजारातील लिंबू आवक घटली आहे. त्यामुळं लिंबाच्या दारत तेजी आली.

सध्या लिंबाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. बाजारातील आवक बघता लिंबाचे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

५) नाफेडने किती हरभरा खरेदी केला? (Nafed Chana procurement)

देशातील बाजारात हरभरा दरात सुधारणा पाहायला मिळाली. अनेक बाजारांमध्ये हरभऱ्याचा सरासरी भाव प्रति क्विंटल ५ हजार रुपयांच्या आसपास पोचला आहे. सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. नाफेडने खरेदी सुरू केली आहे.

पण नाफेडला हरभरा देऊन पैसे मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. खुल्या बाजारातही दर सुधारल्याने हमीभाव आणि खुल्या बाजारातील दरातील तफावत ४ हजार रुपयांपर्यंत आली.

पण जे शेतकरी थांबू शकत नाही ते खुल्या खुल्या बाजारात हरभरा विकत आहेत, असं हरभरा खरेदी केंद्र चालकांनी सांगितलं.

देशात नाफेडने आतापर्यंत २ लाख ७० हजार टन हरभरा खरेदी केला. त्यापैकी सर्वाधिक १ लाख ३५ हजार टनांची खरेदी महाराष्ट्रात झाली. तर गुजरातमध्ये ७२ हजार टन हरभरा शेतकऱ्यांनी नाफेडला विकला.

यंदा हरभरा उत्पादकता २० ते ३० टक्क्यांनी कमी राहील, असं शेतकरी सांगत आहेत. आधी वाढलेली उष्णता आणि नंतर वादळी पाऊस व गारपीटीमुळे हरभरा पिकाचे नुकसान केले. यामुळं उत्पादकता घटली आहे.

नाफेडच्या खरेदीचे प्रमाण आणि उत्पादनातील नेमकी घट याचं चित्र काही दिवसांनी स्पष्ट होईल. त्यावेळी दराबाबत नेमका अंदाज बांधता येईल, असं अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT