Sugarcane Payment Delay: ऊस गाळप हंगाम २०२५-२६ मधील विविध प्रश्नांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी लक्ष वेधून घेतले आहे. जवळपास दीड महिने झाले तरीही राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपी प्रमाणे बिले दिलेली नाहीत. अशा संबंधित कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत करावी आणि थकीत बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत शेट्टी यांनी गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) साखर आयुक्त संजय कोलते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले..गाळप हंगाम २०२२-२३ ते २०२४-२५ अखेर हंगामातील थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यात यावी. २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसापैकी ज्या शेतकऱ्यांनी ५०० टनांहून अधिक ऊस साखर कारखान्यांना पुरविला आहे; अशा उस उत्पादक शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करावी. साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्याने सर्वच कारखाने ५० ते १५० किलोमीटर अंतरावरून ऊस गाळपासाठी कारखान्याकडे आणत आहेत. अशा सर्व साखर कारखान्यांना २५ किलोमीटर अंतरासाठी जास्तीत जास्त प्रतिटन ७५० रुपये तोडणी, वाहतूक खर्च निश्चित करावा आणि त्याहून अधिक अंतराची वाहतूक कारखाना खर्चातून करण्यात यावी, असे शेट्टी यांनी म्हटले आहे..Sugarcane AI Technology: ‘एआय’ तंत्रज्ञानाने उसाचे एकरी ११८ टन उत्पादन!.राज्यातील कारखाने मोठ्या प्रमाणात काटामारी आणि रिकव्हरी चोरी करतात, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक कारखान्यावर राज्य शासनाने डिजीटल काटे बसवून ते ऑनलाईन करावेत. हे वजनकाटे बसविण्यासाठी राज्य शासनाकडे निधी नसल्यास आमदार अथवा खासदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून ते बसविण्यात यावेत. यासाठीही जर सरकारकडे निधी नसेल तर संबधित वजनकाट्याचा खर्च शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून समान पद्धतीने कपात करण्यात यावा. पण तातडीने कारखान्यांवरती शासनाचे वजनकाटे बसविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे..Sugarcane Crushing Season: पुणे विभाग ऊस गाळपात आघाडीवर, कोल्हापूरचा साखर उतारा सर्वाधिक .रिकव्हरी चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे शेट्टी यांनी सांगत, राज्यातील सर्व साखर कारखान्याचे मोलेसिसची टाकी ऑनलाईन सीसीटीव्ही कक्षेत कार्यरत ठेवावी. याचे २४ तास नियंत्रण साखर आयुक्त, साखर सहसंचालक तसेच संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात यावे, आदी मागण्या शेट्टी यांनी साखर आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत केल्या. यावेळी ॲड. योगेश पांडे, प्रकाश तात्या बालवडकर यांच्यासह स्वाभिनानीचे पदाधिकारी उपस्थित होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.