Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे शेतकऱ्यांचा कल
Digital Agriculture: राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विकसित करण्यात आलेले ‘महाविस्तार एआय’ हे अत्याधुनिक ॲप शेतकऱ्यांसाठी प्रभावी डिजिटल मार्गदर्शक ठरत आहे. निलंगा तालुक्यातील एकूण ८२ हजार ३८६ शेतकरी खातेदारांपैकी आतापर्यंत ३ हजार ३४७ शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी केली असून, शेतकऱ्यांचा याकडे कल वाढत असल्याचे चित्र आहे.