Chana Procurement : राज्यात हरभरा खरेदी ६ लाख क्विंटलवर

खुल्या बाजारात हरभऱ्याला आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर मिळत असल्याने यंदा शासकीय हमीभाव खरेदीला सुरुवातीपासूनच प्रतिसाद मिळू लागला आहे.
Chana Procurement
Chana Procurement Agrowon
Published on
Updated on

Chana Market Update अकोला ः खुल्या बाजारात हरभऱ्याला आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर (Chana MSP Rate) मिळत असल्याने यंदा शासकीय हमीभाव (Chana MSP) खरेदीला सुरुवातीपासूनच प्रतिसाद मिळू लागला आहे.

राज्यात १५ मार्चपासून सर्वत्र हरभऱ्याची खरेदी (Chana Procurement) सुरु झाली होती. आतापर्यंत सर्व खरेदीदार एजेन्सींच्या केंद्रांवर मिळून सहा लाख क्विंटलपेक्षा अधिक खरेदी अवघ्या दहा दिवसांत झाली आहे.

राज्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी सुमारे ६०७ केंद्रे मंजूर आहेत. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, मार्कफेड, महा एफपीसी, पृथाशक्ती एफपीसी, वॅपको, महाकिसान व्ही, महाकिसान संघ, महास्वराज्य अशा विविध संस्थांना या रब्बीत खरेदीसाठी नेमण्यात आलेले आहे. सध्या ५८२ केंद्रे राज्यात सुरु झाली आहेत.

खुल्या बाजारात हरभऱ्याचा दर अवघा ४ हजारांपासून मिळत आहे. चांगल्या दर्जाचा हरभरा सरासरी ४५०० रुपयांपर्यंत विकत आहे. तर दुसरीकडे शासनाचा हमीभाव ५३३५ रुपये प्रतिक्विंटल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा शासकीय खरेदी केंद्रांकडे असल्याने आजवर ४ लाख ९३ हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Chana Procurement
Chana, Wheat Market : पावसामुळे गहू, हरभरा, जिऱ्याच्या भावात वाढ

या हंगामासाठी नाफेडला हरभरा खरेदीचे ८० लाख क्विंटलचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी राज्यात आतापर्यंत सहा लाख क्विंटलपेक्षा अधिक खरेदीचा टप्पा पूर्ण झाला आहे. हरभरा विक्री करण्याच्या उद्देशाने शासनाकडून ३१ मार्चपर्यंत नावनोंदणी सुरु आहे. हरभऱ्याचे सर्वदूर चांगले पीक असल्याने शासनाने दिलेले खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे अधिकारी सांगत आहेत.

Chana Procurement
Chana Procurement : खानदेशात हरभरा खरेदी रखडत

केंद्रांवर विक्रीसाठी रांगा

हरभरा विक्रीला आणण्यासाठी नोंदणीधारक शेतकऱ्यांना केंद्राकडून संदेश पाठवला जातो. सध्या प्रत्येकच केंद्रावर खरेदीची लगबग आहे. वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत.

प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून सुरु असलेल्या खरेदी केंद्रांवर गर्दी लोटलेली आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक १ लाख ६७ हजार क्विंटल खरेदी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून झाली आहे.

संस्थानिहाय सुरु केंद्रे आणि खरेदी

संस्था...केंद्र...खरेदी (क्विंटल)

व्हीसीएमएफ...४९...१०५९३३

मार्कफेड...२०६...१५६०८२

महाएफपीसी...१३१...१६७६५३

पृथाशक्ती...७०...११०६०६

वॅपको...६२...४३६८७

महाकिसान व्ही...२०...४१८८

महाकिसान संघ...२२...९१९१

महास्वराज्य...२२...२७८७

एकूण...५८२...६००१२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com