Garlic  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : लसणाचे वाढते भाव किती दिवस टिकतील?

Market Update : सध्या राज्यातील बाजारात लसूण प्रतिक्विंटल १८ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावाताली नरमाई कायम आहे. ब्राझीलमध्ये पावसाचा अंदाज आहे. पाऊस झाल्यानंतर ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात वाढ होऊ शकते, असा अंदाज गृहीत धरून बाजारात नफावसुली सुरु आहे. त्यामुळे विक्री वाढली. याचा दबाव बाजारावर येत आहे.

तर देशातील बाजारात सोयाबीनची आवक कायम आहे. सोयाबीनची आवक दीड लाख क्विंटलच्या दरम्यान दिसते. त्यामुळे बाजारात सोयाबीनचा भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात कापसाचे भाव दाबवातच आहेत. बाजारातील आवक आजही कायम आहे. त्यामुळे भावही कमी आहेत. आजही कापसाची भवपातळी सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते.

कापसाचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासून दाबावातच आहेत. हंगाम सुरू होऊन ४ महिने होत आले तरी भाव कमीच असल्याने शेतकरी कापसाची विक्री करत आहेत. यामुळे भवावरील दबाव कायम दिसतो. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोच्या भावात आज काहीशी नरमाई दिसून आली. बाजारातील टोमॅटोची आवक मागील काही दिवसांपासून कमी जास्त होताना दिसत आहे. त्याचा परिणाम बाजारावर होत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.

मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोचा भाव काहीसा कमी दिसतो. टोमॅटोची आवक आणखी काही दिवस चांगली राहू शकते. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

लसूण बाजारात सध्या चांगलाच भाव खात आहे. लसणाची बाजारातील आवक खपूच कमी आहे. तर मागणी मात्र चांगली दिसते. लसणाला सध्या लग्न समारंभ आणि हाॅटेल क्षेत्रातून चांगली मागणी येत आहे. याचा आधार लसणाच्या भावाला मिळत आहे.

त्यामुळे लसणाचे भाव तेजीत आले. सध्या राज्यातील बाजारात लसूण प्रतिक्विंटल १८ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. किरकोळ बाजारात लसणाचे भाव चांगेच वाढले आहेत. यापुढील काळातही लसणाची मागणी कायम राहून, लसणाच्या भावातील तेजीही कायम राहू शकते, असा अंदाज आहे.

देशातील बाजारात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. तुरीच्या भावात मागील काही दिवसांमध्ये पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील आवक मर्यादीत असल्याने भावाला आधार मिळत आहे. एरवी ऐन आवकेच्या हंगामात तुरीच्या भावावर दबाव आलेला असतो.

पण यंदा बाजारातील कमी आवक आणि सरकारी खरेदीचाही तूर बाजाराला आधार मिळत आहे. त्यामुळे तुरीचे भाव सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीच्या भावातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT