Agrowon Podcast : कांदा बाजारावर आवकेचा दबाव कायम

Market Update : कांद्याच्या बाजारावरील दबाव कायम आहे. कांद्याचे भाव आठवडाभरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयाने कमी जास्त होताना दिसत आहेत.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : सोयाबीन बाजाराने आजही शेतकऱ्यांचा हिरमोड केला. सोयाबीनची बाजारातील आवक कायम असून दरपातळीही दबावातच आहे. देशातील बाजारात आजही सोयाबीनला ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन निचांकी पोचले.

सोयाबीनचे वायदे १२.१९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६३ डाॅलर प्रतिटनांवर होते. जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनातील वाढ आणि कमी उठाव याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येत आहे. पण देशात यंदा उत्पादन घटले आहे. असे असूनही भाव दबावात आहेत. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी वाढ दिसून येऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. कापसाचे वायदे ८२.७० सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर काॅटलूक ए इंडेक्स वाढून ९२.१० सेंटवर पोचला होता. बाजारात घडत असलेल्या सकारात्मक घडामोडींचा कापूस बाजारावर परिणाम दिसून येत आहे.

मात्र देशातील बाजारावर अजूनही आवकेचा दबाव दिसतो. बाजारातील आवक सरासरी १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान कायम आहे. राज्यातील आवक आजही जास्त होती. त्यामुळे कापूस भाव ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज आहे.

Onion Market
Onion Rate : डिसेंबर महिन्यात झाली कांद्याची दरकोंडी

देशातील मोठ्या बाजारातील कायम असलेली आवक आणि इतर छोट्या मोठ्या बाजारांमध्ये वाढत असलेली लाल कांद्याची आवक यामुळे कांद्याच्या बाजारावरील दबाव कायम आहे. कांद्याचे भाव आठवडाभरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयाने कमी जास्त होताना दिसत आहेत.

आजही कांद्याला सरासरी १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर गुजरातसह देशाच्या इतरही भागातून कांद्याची आवक सुरु आहे. खरिपातील कांदा असल्याने शेतकऱ्यांना लगेच विक्री करावी लागते. त्यामुळे बाजारातील आवक चांगली दिसते. आवकेचा दबाव कांदा बाजारावर दिसून येत आहे. 

Onion Market
Onion Rate : कांद्याला मिळेना उत्पादन खर्चाएवढाही भाव

गवारचे भाव मागील काही महिन्यांपासून सरासरीवर टिकून आहेत. गवारला चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होत असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगतात. बाजारातील गवारची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मात्र दुसरीकडे गवारला चांगला उठाव मिळतोय. त्यामुळे गवारच्या भावाला आधार आहे.

सध्या गवारचे भाव ५ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान कायम आहेत. तर आवक सरासरीपेक्षा ३० टक्क्यांनी कमी आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बाजारात संत्रीची आवक सुरु असून भाव दबावात दिसून येत आहेत. त्यातच वाढत्या थंडीमुळे संत्रीला उठाव कमी दिसतो. राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये संत्रीची आवक जास्त दिसते. मुंबईच्या बाजारात जवळपास ३ हजार क्विंटलची आवक झाली होती. तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक कमी जास्त होती.

संत्र्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. संत्र्याची आवक कमी होताना दिसत आहे. तसेच थंडी कमी झाल्यानंतर संत्र्याला पुन्हा उठाव मिळू शकतो, त्यामुळे संत्र्याच्या भावालाही आधार मिळेल, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com