Agrowon Podcast : नव्या तुरीची आवक वाढल्यानंतर भाव काय राहू शकतात?

Market Update : तुरीचे भाव सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीच्या भावातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : देशातील बाजारात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. तुरीच्या भावात मागील काही दिवसांमध्ये पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील आवक मर्यादीत असल्याने भावाला आधार मिळत आहे. एरवी ऐन आवकेच्या हंगामात तुरीच्या भावावर दबाव आलेला असतो.

पण यंदा बाजारातील कमी आवक आणि सरकारी खरेदीचाही तूर बाजाराला आधार मिळत आहे. त्यामुळे तुरीचे भाव सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीच्या भावातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज आहे.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई आली होती. म्हणजेच आठवड्याचा शेवट भाव कमी होण्यासह झाला. सोयाबीन निचांकी १२.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयपेंड ३५६ डाॅलरवर पोचले.

देशातील बाजारात आवकेचा दबाव कायम असून भावही स्थिर दिसतात. दरात केवळ २० ते ५० रुपयांच्या दरम्यान चढ उतार होत आहेत. तर दरपातळी ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बााजरातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur Market
Tur Procurement : ‘नाफेड’च्या तूर खरेदीस अल्प प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीनने निराशा केली तरी कापसाने मात्र आधार दिला. कापसाच्या भावात शुक्रवारी जवळपास २ टक्क्यांची वाढ झाली होती. कापसाचे वायदे ८३.९३ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर काॅटलूक ए इंडेक्स मात्र ९१.१५ सेंटवर कायम होता. देशातील बाजारात आजही आवकेचा दबाव दिसून आला.

कापूस आवक १ लाख ९३ हजार गाठींच्या दरम्यान होती. आवकेचा दबाव असल्याने कापूस बाजार ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांवर होता. कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur Market
Tur Production : आगामी खरिपात तुरीवर करा लक्ष केंद्रित

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते.

सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात सध्या हळदीचे भाव स्थिरावले आहेत. संक्रातीपासून काही बाजारात हळदीची आवक सुरु झाली. पुढच्या महिन्यात हळदीची बाजारातील आवक वाढेल. नव्या मालाच्याआवकेमुळे दरात काहीशी नरमाई दिसून येत आहे. पण हळदीचे भाव मर्यादीत पातळीतच नरमले आहेत. हळद पिकाला यंदा कमी पाऊस, अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला.

यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या हळदीला बाजारात १० हजार ते १३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारावर आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी काहीसा दबाव येऊ शकतो. पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com