Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : लसणाचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत गवार दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, लसूण आणि गवार पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनचे वायदे आणि देशातील भाव सतत एकाच पातळीदरम्यान दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.५५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३४४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे.

तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यतेल आयातीचा दबाव आहे. त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमध्ये कालापासून काहीशी तेजी आली आहे. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७५.१० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५९ हजार ६४० रुपये प्रतिखंडीवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला वाढलेली मागणी आणि कच्च्या तेलाचे वाढलेले भाव यामुळे सुधारणा झाली.

तर देशातही कापसाची मागणी काहीशी सुधारल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्येही काही सुधारणा दिसून आली. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशात हरभऱ्याचे भाव कायम आहेत. सरकारने हरभऱ्यासाठी आयात खुली केल्यानंतरही भाव कमी झाले नाही. त्यामुळे सरकारने हरभऱ्यावर स्टाॅक लिमिट लावले. पण देशातील बाजारात हरभऱ्याची आवक खूपच कमी आहे.

तर दुसरीकडे हरभऱ्याचा उठाव चांगला आहे. त्यामुळे हरभरा भाव आजही ५ हजार ९०० ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभऱ्याची मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी काही महीने हरभरा भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकंनी व्यक्त केला. 

राज्यात लसणाचे भाव तेजीत आहेत. बाजारातील लसणाची आवक खूपच कमी आहे. सरासरीपेक्षा आवक जवळपास ३० टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे व्यापारी सांगत आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात लसणाचा पुरवठा कमी आहे. पण दुसरीकडे लसणाची मागणी टिकून आहे.

त्यामुळे लसणाचे भाव मागील काही महिन्यांपासूनच तेजीत आहेत. सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

बाजारात गवारची आवक कमीच असून दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे. त्यामुळे गवारचे भाव तेजीत आहेत. गवारच्या उन्हाळी लागडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती. आजही पिकाला बहुतांशी ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील आवकेवर होत आहे. त्यामुळे गवारचा भाव ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought 2026 : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा महसूलमंत्र्यांनी घेतला आढावा; नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश

Tur Story: तुरीची गोष्ट

Weather Update : ढगांची गर्दी; पावसात नाही जोर!

Rajkesar Mango : हिमायतबागेच्या राजकेसर आंबा वाणाला मान्यता

Global Agri Market: जागतिक शेतीमाल बाजारातील नरमाई तात्पुरती?

SCROLL FOR NEXT