Agrowon Podcast : टोमॅटोच्या दरात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, डाळींब तसेच ज्वारीचे दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, ज्वारी आणि डाळींब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा दिसून आली होती. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही वायदे काहीसे वाढले होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी ७३.६५ सेंटवर होते. देशातील वायदेही ५८ हजार ३०० रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची काहीशी कमी झाली. कापूस बाजारात अजूनही अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनच्या बाजारातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील चढ उतार कायम असून दबावही आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.५७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३४५ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Agrowon Podcast : हरभरा तेजी टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आल्याचे दर ?

ज्वारीच्या भावातील नरमाई कायम आहे. आजही ज्वारीचे भाव अनेक बाजारांमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमीच आहेत. रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर भाव कमी झाले आहेत. शेतकरी आजही भाववाढीची वाट पाहत आहेत. ज्वारीला मागील तीन महिन्यांपासून २ हजार ३०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीवरीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

Agriculture Market
Banana Rate : केळी दरात आठवड्यात टनास तीन हजार रुपयांनी वाढ

टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. बाजारातील घटलेली आवक आणि चांगल्या उठावामुळे टोमॅटो सध्या भाव खात आहे. देशातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. टोमॅटोचा बाजार सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. यापुढच्या काळात आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

डाळिंबाचे बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत. डाळींब पिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. डाळिंबाचा उचांकी भाव काही ठिकाणी १५ हजार ते काही ठिकाणी २५ हजार रुपये दिसत आहे. पण डाळिंबाला सध्या सरासरी ८ हजार ते १० हजार रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे. ही भावपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com