Tur Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Market Rate : उत्पादन घट, मजबूत मागणीमुळे तूर तेजीत राहण्याचा अंदाज

देशात यंदा जुन्या तुरीची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग खरेदीत सक्रिय आहे.

Anil Jadhao 

१) कापूस दरातील घट कायम (Cotton Rate)

देशातील बाजारात कापूस दरातील नरमाई कायम आहे. आजही काही बाजारांमध्ये कापसाचे भाव क्विंटलमागं १०० ते २०० रुपयाने कमी झाले होते. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपये दर मिळाला.

मात्र आंतरराष्ट्रीय बाजातही चढ उतार कायम आहेत. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ८५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील कापूस दरावर काही दिवस दबाव राहू शकतो. मात्र पुढील काळात दर सुधारू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) सोयाबीन दरात किंचित सुधारणा (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडचे दर (Soya meal Rate) तेजीत आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे दर ४९४ डाॅलर प्रतिटन होते.

देशातील काही बाजारांमध्येही सोयाबीन दरात क्विंटलमागं ५० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. मात्र सरासरी दरपातळी कायम होती. आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला चांगला उठाव आहे. त्यामुळे देशातील बाजारातही सोयाबीनला आधार मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) शेवग्याची आवक घटली

बाजारात सध्या शेवग्याला चांगला भाव मिळत आहे. मात्र बाजारातील आवक खूपच कमी आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर बाजार समित्या वगळता इतर ठिकाणची आवक ५ क्विंटलपेक्षाही कमी होत आहे.

त्यामुळे सध्या शेवग्याला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. शेवग्याचे दर पुढील काही दिवस तरी तेजीत राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) भेंडीचे दर तेजीत

राज्यातील बाजारात सध्या भेंडीची आवक घटली आहे. आवकेचा दबाव कमी असल्याने भेंडीचे दरही तेजीत आहेत. मोठ्या बाजार समित्या वगळता इतर बाजारांतील आवक सरासरी ५ क्विंटलपेक्षाही कमी आहेत.

त्यामुळं सध्या भेंडीला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. भेंडीचे दर पुढील महिनाभर या दरपातळीवर राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) तुरीचे भाव यंदा काय राहू शकतात? (Tur Rate, Tur Market)

केंद्र सरकारने आपल्या पहिल्या अंदाजात यंदा देशात जवळपास ३९ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र नुकतेच केंद्रीय अन्न सचिवांनी यंदा देशातील तूर उत्पादन ३२ ते ३३ लाख टनांच्या दरम्यानच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

तर बाजारातील व्यापारी आणि जाणकारांच्या मते यंदा देशात ३० लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होणार नाही. देशातील अनेक बाजारांमध्ये आता नव्या तुरीची आवक वाढली आहे. देशात आता जवपास १३ लाख क्विंटल नवी तूर बाजारात आल्याचा अंदाज आहे.

देशातील बाजारात विक्री झालेल्या एकूण १३ लाख क्विंटल तुरीपैकी सर्वाधिक माल कर्नाटकातील आहे. कर्नाटकात आत्तापर्यंत जवळपास ८ लाख क्विंटल तूर बाजारात आली. तर महाराष्ट्रातील बाजारात जवळपास ५ लाख क्विंटल तूर दाखल झाली होती.

देशात यंदा जुन्या तुरीची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग खरेदीत सक्रिय आहे. तर म्यानमारमधून येणाऱ्या तुरीचे भावही सध्या प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांच्या वरच आहेत. त्यामुळे सध्या नव्या तुरीतील ओलावा जास्त असला तरी भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

यंदा देशातील उत्पादनाची स्थिती पाहता तुरची सरासरी दरपातळी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदजा तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT