Soybean Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Rate : सोयाबीनचे दर का नरमले?

देशातील बाजारात सोयाबीनच्या कमाल आणि किमान दरात काहीशी नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातही दरात चढउतार सुरु आहेत.

अनिल जाधव

सोयाबीनचे दर का नरमले?
अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात मागील आठवडाभरापासून सोयाबीनचे दर (Soybean Rate) तेजीत आले होते. त्यामुळं शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केली होती. मात्र आज देशातील बाजारात सोयाबीनच्या कमाल आणि किमान दरात काहीशी नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातही दरात चढउतार सुरु आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन बाजारात चढउतार पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर मागील दोन दिवसांमध्ये एका भावपातळीभोवती फिरत होते. काल सोयाबीनच्या वायद्यांनी १४.५५ डाॅलर प्रबुशेल्सचा टप्पा गाठला होता. त्यानंतर त्यात चढउतार होत आज १४.४९ डाॅलरवर दर आले. सोयापेंडचे दर मात्र कालच्या तुलनेत आज काहीसे वाढलेले दिसले. काल ४१९ डाॅलर प्रतिटनानं सोयापेंडचे वायदे पार पडले होते. ते आज ४२१ डाॅलरवर पोचले. सोयातेलाचे दर मात्र आज अर्धा टक्क्यांनी नरमले होते. सोयातेलाचे दर आज ७४.६६ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

देशातील बाजारात आज सोयाबीन दरवाढीला ब्रेक लागलेला दिसला. सोयाबीनचे दर क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांनी नरमले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन्ही महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये आज दर नरमलेले दिसले. देशातील प्रक्रिया प्लांट्सनी दर कमी केल्याचा परिणाम बाजारावर आज जाणवला.

आज बहुतांशी ठिकाणी सोयाबीनचे नरमले होते. मध्य प्रदेशात सोयाबीनला आज सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. कालच्या तुलनेत आज दरात १०० ते २०० रुपयांची घट जाणवली. महाराष्ट्रातही सोयाबीन दर सरासरी २०० रुपयांनी नरमले होते. आज महत्वाच्या बाजारांमध्ये सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयाने सोयाबनचे व्यवहार झाले. राजस्थानमध्येही याच दरम्यान सोयाबीनला दर मिळतोय.

मागील ६ दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटलमागं सरासरी ५०० ते ६०० रुपयांची सुधारणा झाली होती. त्यामुळं दरामध्ये काहीशी नरमाई येण्याचा अंदाज होता. त्यानुसार दरात काहीसे करेक्शन झाले. पण दरात फार मोठी मंदी येण्याची शक्यता नाही. सोयाबीनच्या सरासरी दरात फार घट येण्याची शक्यता कमीच आहे. सोयाबीनची दरपातळी पुढील काही दिवस ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT