Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Market : अमरावती बाजारात आंब्याची आवक, दर स्थिर

Mango Rate : अमरावतीसह विदर्भात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पारा वाढलेलाच असल्यामुळे उन्हाळी फळांची मागणीदेखील स्थिर असल्याचे सांगितले जाते.

Team Agrowon

Amaravati News : बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली विविध जातीच्या आंब्याची आवक स्थिर असून दरातही मोठे चढउतार झाले नाहीत, अशी माहिती अमरावतीच्या फळ व भाजीपाला बाजारातील व्यापारी सूत्रांनी दिली. अमरावतीसह विदर्भात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पारा वाढलेलाच असल्यामुळे उन्हाळी फळांची मागणीदेखील स्थिर असल्याचे सांगितले जाते.

सध्या अमरावती फळ आणि भाजीपाला बाजारात दसेरी आंब्याची आवक रोज ५७० क्‍विंटल होत आहे. या आंब्याला ३५०० ते ५५०० रुपयांचा दर मिळत असून दरदेखील गेल्या महिनाभरापासून स्थिर आहेत. लंगडा जातीच्या आंब्याला ५००० ते ७००० रुपयांचा दर मिळत आहे. याची आवक ३९० क्‍विंटल असल्याचे सांगण्यात आले.

आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतून बाजारात येणाऱ्या बैंगणपल्ली जातीच्या आंब्याची आवक मात्र संपुष्टात आली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत या आंब्याची आवक होत होती, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. त्यानंतरच्या काळात ती टप्प्याटरप्प्याने कमी होत आता शून्यावर आली आहे.

निलम जातीचा आंबादेखील बाजारात येत आहे. ३००० ते ३५०० रुपयांनी याचे व्यवहार होत असून याची आवक २४० क्‍विंटल होती. तोतापुरी आंब्याचे दर २५०० ते ३००० रुपये असून याची आवकदेखील मंदावली आहे. विदर्भातील बाजारात आंबा आवक या महिन्याच्या अखेरपर्यंत राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

टरबूज-खरबुजाची आवक नियमित

टरबूज आणि खरबुज या दोन्ही फळपिकांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. सध्या टरबुजाला १२०० ते १८०० रुपये क्‍विंटलचा दर मिळत असून याची आवक ५२० क्‍विंटल आहे. खरबुज आवक २१० क्‍विंटल तर दर १४०० ते २००० रुपयांवर होते.

लिंबूदर पुन्हा दबावात

यंदाच्या उन्हाळ्यात लिंबाला अपेक्षित मागणी नव्हती. त्यामुळेच तापामनात वाढ झाली असतानाही लिंबाचे दर मात्र दबावात असल्याचे चित्र होते. ३००० ते ५००० रुपये क्‍विंटलप्रमाणे लिंबाला दर मिळाला. आता पुन्हा लिंबाचे दर दबावात आले असून ३००० ते ४००० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. लिंबाची आवक अवघी दहा क्‍विंटल आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT