स्वामीनाथन आयोगाच्या सी २ प्लस ५० टक्के सूत्रानुसार एमएसपी लागू केली नाही बिहारमधील भात, गहू आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना २०२४-२५ वर्षात सुमारे १० हजार कोटींचा फटकाC2+50 सूत्रानुसार शेतमाल खरेदी केला असता शेतकरी सुमारे ३ लाख कोटी कमावू शकले असते.Farmers Loss: एमएस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या सी २ प्लस ५० टक्के सूत्रानुसार किमान आधारभूत किंमत लागू केली नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे बिहारमधील भात, गहू आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना २०२४-२५ वर्षात सुमारे १० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा अखिल भारतीय किसान सभेने (AIKS) केला आहे..२०२४-२५ या वर्षात, २० प्रमुख खरीप आणि रब्बी पिकांचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची जर सी २ फ्लस ५० टक्के (C2+50) सूत्रानुसार निश्चित केलेल्या भावात खरेदी केली असती तर ते सुमारे ३ लाख कोटी रुपये अधिक कमावू शकले असते, असे किसान सभेने म्हटले आहे..Dr.Swaminathan: डॉ. स्वामिनाथन यांच्या विचारांची कास धरूया."स्वामीनाथन आयोगाने उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देण्याची केलेली शिफारस अद्याप लागू करण्यात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये आश्वासन दिले होते की, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जातील. शेतकऱ्यांना सी २ प्लस ५० टक्के या सूत्रानुसार पैसे मिळतील. पण अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही," असे किसान सभेचे सरचिटणीस विजू कृष्णन यांनी पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले..बिहारमधील सीपीआय(एम) शी संलग्न असलेली शेतकरी संघटना किसान सभेने म्हटले आहे की, सी २ प्लस ५० टक्के किमतीचे सूत्र लागू न केल्याने २०२४-२५ मधील हंगामात भात, गहू आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचे एकूण सुमारे १० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले..Nana Patekar : स्वामिनाथन आयोग लागू करा.सुमारे नऊ वर्षांच्या कालावधीत, शेतकऱ्यांचे एकत्रित ७१ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २००६ मध्ये बाजार समिती व्यवस्था बंद केल्यामुळे खरेदी प्रक्रियेतील अकार्यक्षमता आणि हमीभावाची खात्री नसल्याने प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा खूपच अधिक असण्याची शक्यता आहे," असे किसाने एका निवेदनात म्हटले आहे..किसान सभेचे वित्त सचिव पी. कृष्णा प्रसाद यांनी, २००६ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणाऱ्या बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारची भूमिका गरीबांच्या विरोधी असल्याचा आरोप केला आहे..बाजार समित्या बंदत्यांनी पुढे म्हणाले की, बिहारमधील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या तीन प्रमुख समस्या म्हणजे, त्यांना शेतमाल विकण्यासाठी बाजार समिती उपलब्ध नसणे, मनरेगाची वाईट परिस्थिती आणि येथील मोठ्या प्रमाणात शेतमजूर हे भूमिहीन आहेत..एआयकेएस ही संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) चा एक भाग आहे. या संघटनेने २०२०-२१ मधील दिल्लीच्या सीमेवर शेती कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.