Mango Market
Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Rate : नाशिकमध्ये आंब्याचे दर टिकून

Team Agrowon

Nashik News : यंदा नैसर्गिक आपत्तींमुळे आंबा हंगामावर (Mango Season) परीणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मात्र अशा अडचणीच्या काळातही अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर आंबा बाजारात आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत आवक सर्वसाधारण असल्याने यंदा आंब्याच्या दरात (Mango Rate) किलोमागे २० ते ३० रुपयांनी सुधारणा दिसून आली.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अक्षय्यतृतीयेला बाजारात आंब्याचे उत्पादन असूनही वितरण साखळी विस्कळीत झाली होती. त्यामुळे आवक सर्वसाधारण झाल्याने उपलब्धतेवर परिणाम झाला होता.

त्यातच लॉकडाऊन झाल्याने बाजार आवार बंद होते. तर संचारबंदीमुळे ग्राहक बाहेर पडू शकत नसल्याने खरेदीच्या खाली दर होते. मात्र मागील वर्षापासून बाजारात मागणी वाढल्याने दर वधारले आहेत.

नाशिक बाजारात कोकण, आंध्र प्रदेश व कर्नाटक या भागांतून आंबा मोठ्या प्रमाणावर येतो. यामध्ये गोडी व आकर्षक असलेल्या आंब्यांना ग्राहकांकडून विशेष मागणी असते.

मात्र यंदा मागणीच्या तुलनेत पुरवठा तसेच आवक कमी झाल्याने दरात काहीशी तेजी आहे. गेल्या तीन दिवसांत २५० ते ४५० क्विंटलपर्यंत आवक झाली.

विविध प्रकारच्या वाणास ६० ते २२० रुपयांपर्यंत दर मिळाले. तर किरकोळ विक्रीत यावर्षी दरात सुधारणा झाली. देवगड हापूस आंब्याची एक डझनची पेटी ६०० तर रत्नागिरी हापूसची पेटी ५५० रुपयांना होती.

आंब्याचा वाण....दर

आंबा...:वर्ष २०२२...वर्ष २०२३

हापूस...१६० ते १७०...२००

बदाम...६० ते ७०...९० ते ११०

केशर...१४० ते १५०...१४० ते २००

बेंगलोर केशर...८० ते ११०...१२० ते १३०

लालबाग...५० ते ६०...७० ते ८०

गेल्या पंधरा वर्षांपासून आंब्याची किरकोळ विक्री करतो मात्र यंदा आंब्याच्या उपलब्धतेवर थोडाफार परिणाम दिसून आला. मागील वर्षाच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी आंब्याच्या दरात सुधारणा झाली आहे.

- दीपक नवगिरे, आंबा विक्रेता.

यंदा आवक सर्वसाधारण राहिली. मात्र तुलनेत दर सुधारले आहेत. गुणवत्ता, रंग आणि चव असल्यास ग्राहक हमखास दर देतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण माल उपलब्ध करण्याकडे आमचा कल आहे.

- मनोज बडगुजर, एमआर. फ्रूट कंपनी, नाशिक बाजार समिती.

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान आहे. मात्र तरीही यावर्षी अक्षयतृतीयेसाठी मोठ्या प्रमाणावर आंबा आला आहे. मात्र मागणीच्या तुलनेत हे प्रमाण थोडेफार कमीच दिसून येते. त्यामुळे यावर्षी दर पुन्हा वाढले आहेत.

- मंगेश गुप्ता, संचालक दर्शन फ्रूट कंपनी, नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT