Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : खानदेशात मका दर २९०० रुपयांपर्यंत

Maize Rate : खानदेशातील बाजारांत मका आवक अल्प आहे. दरात मागील महिनाभरापासून सुधारणा सुरूच आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील बाजारांत मका आवक अल्प आहे. दरात मागील महिनाभरापासून सुधारणा सुरूच आहे. मका दर विक्रमी म्हणजेच २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचले आहेत. काही शेतकऱ्यांकडे मका आहे. अत्यल्प शेतकऱ्यांनाच या दरांचा लाभ होत असल्याचे दिसत आहे.

खानदेशात खरीप व रब्बी हंगामात मका पीक महत्त्वाचे आहे. मागील तीन वर्षांत मका लागवडीत सतत वाढ झाली आहे. यंदा खरिपात एकट्या जळगाव जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिकची मका लागवड झाली आहे. गेल्या रब्बीत खानदेशात सुमारे ७१ हजार हेक्टरवर मका लागवड झाली होती.

कोविड काळानंतर मका लागवड वाढली आहे. मक्याचे दर मागील खरिपात १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. तर रब्बीत शिवार खरेदीत किमान १५०० व कमाल १८५० रुपये दर मक्यास मिळाला. बाजार समितीतही मका आवक होती. लिलावात मक्यास कमाल २१५० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचे दरही मिळाले.

एप्रिल ते मे महिन्यात मका आवक वेगात झाली. जूनमध्ये सुरवातीचे सात ते आठ दिवस मका आवक बाजारात सुरू होती. नंतर आवकेत मोठी घट झाली. एप्रिल महिन्यात खानदेशातील प्रमुख बाजारात मक्याची आवक प्रतिदिन सरासरी ८ हजार क्विंटलपेक्षा अधिक झाली.

जळगाव, चोपडा, जामनेर, अमळनेर, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), शिरपूर, नंदुरबार या बाजार समित्या मक्यासाठी प्रसिद्ध आहेत. मे महिन्यातही आवक चांगली होती. या काळात किमान दर १५०० रुपयांखाली नव्हते. तर कमाल दरही बाजारातील लिलावात १९०० ते २००० रुपये असे होते.

जूनमध्ये मक्याची आवक प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल राहिली. जूनमध्ये दरात सुधारणा सुरू झाली. जूनमध्ये मका दर कमाल २४०० रुपये प्रतिक्विंटल होते. तर या महिन्यात दरात सुधारणा सुरूच आहे. १४ जुलैपर्यंत मका दर २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात मागील तीन दिवसांत सुधारणा झाली असून, कमाल दर २९०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

मध्य प्रदेश, गुजरातमधून मोठा उठाव

मक्यास मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील बडोदा, सुरत आदी भागांतील मोठ्या बाजारांतील खरेदीदार खानदेशात मागणी नोंदवीत आहेत. सध्या व्यापारी ते व्यापारी असे व्यवहार अधिकचे होत आहेत. खानदेशातील पशुखाद्य व अन्य कारखान्यांतही मक्यास उठाव आहे. शेतकऱ्यांकडून बाजारात अपवादानेच मका आवक सध्या होत आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT