Maize Market : जालन्यात मका दर अडीच हजाराजवळ

Maize Rate : विविध शेतीमालाच्या आवकेत चढ-उतार
Maize Market
Maize MarketAgrowon
Published on
Updated on

संतोष मुंढे

Jalna News : जालना येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात विविध शेतमालाच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला. मक्याला अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर मिळाले.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २ ते ८ जुलै दरम्यान बाजरीची एकूण ११३७ क्विंटल आवक झाली. १३३ ते ४३० क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीचे सरासरी दर २३७० ते २४५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. कमाल दर २६०० रुपये क्विंटलपर्यंत राहिले. हरभऱ्याची एकूण आवक ५६३ क्विंटल झाली.

७४ ते १६४ क्विंटल दरम्यान कमी-अधिक आवक झालेल्या हरभऱ्याला ६३५० ते ६४५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाले. मक्याची एकूण आवक २३२ क्विंटल झाली. १९ ते १०२ क्विंटल आवक झालेल्या मक्याचे सरासरी दर २४५० रुपये ते २५७५ रुपये प्रतिक्विंटल राहिले.

मक्याला किमान २१५० ते कमाल २५७५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला. पांढऱ्या तुरीची एकूण आवक ७७१ क्विंटल झाली. ९४ ते २७७ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या तुरीला १०२०० ते १०६०१ रुपये सरासरी दर मिळाला. कमाल दर ११,६७६ रुपयांपर्यंत राहिले.

Maize Market
Maize Market : खानदेशात मका दर कमाल २२५० रुपये प्रतिक्विंटल

सोयाबीनचे दर वाढेना

सोयाबीनचे दर वाढत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात सोयाबीन शेतकऱ्यांना विकावे लागते आहे. सोयाबीनची एकूण आवक ८१४७ क्विंटल झाली. १२२७ ते २१६५ क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ४४०० ते ४४२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ज्वारीची एकूण आवक ७४१ क्विंटल झाली. ९२६ ते १९१७ क्विंटल आवक झालेल्या ज्वारीला सरासरी २५५० ते २६०० रुपये दर मिळाला.

रेशीम कोषांची आवक घटली

एकवेळ राज्यभरातून रेशीम कोषाची आवक होणाऱ्या जालना बाजार समितीमधील रेशीम कोषांची आवक घटली आहे. आठवडाभरात केवळ दोन वेळा मिळून ५ क्विंटलच रेशीम कोषांची आवक झाली. त्यास एक वेळा सरासरी ४१ हजार रुपये तर दुसऱ्या वेळा सरासरी ३५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

दोन प्रकारच्या गुळाची आवक

आठवडाभरात बाजार समितीमध्ये तांबूस व पिवळा अशा दोन प्रकारच्या गुळाची तीन वेळा मिळून १५६ क्विंटल आवक झाली. दोन वेळा मिळून ७७ क्विंटल आवक झालेल्या तांबूस गुळाला पहिल्यावेळी ३४५० रुपये तर दुसऱ्यावेळी ३६५६ रुपये क्विंटलचा सरासरी दर मिळाला. ७९ क्विंटल आवक झालेल्या पिवळ्या गुळाला सरासरी ३६०० रुपये क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com