Maize Farming Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Khandesh Agriculture Update: खानदेशात मका लागवड वाढणार; कापूस क्षेत्र घटणार

Kharif Season 2025 : खानदेशात चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा आहे. यात खरिपाचे नियोजन सुरू असून, शेतकरी यंदा कापसाऐवजी मका लागवडीकडे वळतील, अशी स्थिती असून, मक्याची लागवड खानदेशात ५० ते ६० हजार हेक्टरने वाढेल, असे दिसत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा आहे. यात खरिपाचे नियोजन सुरू असून, शेतकरी यंदा कापसाऐवजी मका लागवडीकडे वळतील, अशी स्थिती असून, मक्याची लागवड खानदेशात ५० ते ६० हजार हेक्टरने वाढेल, असे दिसत आहे.

सोयाबीनलादेखील पसंती मिळणार आहे. यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रातही वेळेत पाऊस आल्यास वाढ होईल. परंतु स्थिर दर व पावसात होणारे कमी नुकसान, कापसापेक्षा कमी खर्च आणि दिवाळीनंतर मक्याखालील क्षेत्रात लागलीच दुबार हंगाम किंवा रब्बी हंगाम पेरणी करता येत असल्याने शेतकरी मक्यास पसंती देतील, असे दिसत आहे.

कोरडवाहू व पूर्वहंगामी कापसाची लागवड खानदेशात कमी होईल, असे दिसत आहे. खानदेशात यंदा एकूण कापूस लागवड सुमारे साडेसात लाख हेक्टरवर होईल. मागील हंगामात सुमारे आठ लाख १२ हजार हेक्टरवर कापूस पीक होते. जळगाव जिल्ह्यात कापसाची लागवड मागील हंगामात पाच लाख ११ हजार हेक्टरवर झाली होती.

धुळ्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर आणि नंदुरबारमध्ये ९५ हजार हेक्टरवर कापूस पीक होते. यंदा जळगाव जिल्ह्यातील कापूस लागवड चार लाख ७० हजार हेक्टरवर होऊ शकते. तर धुळे व नंदुरबारमधील एकूण लागवड दोन लाख ७० हजार हेक्टर अशी राहू शकते. तिन्ही जिल्ह्यांत कापसाची लागवड कमी होईल. कापसाऐवजी मका व सोयाबीनला पेरणीस पसंती मिळेल.

खानदेशात मक्याची लागवड तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक राहू शकते. एकट्या जळगाव जिल्ह्यातील मका लागवड पावणेदोन लाख हेक्टरपेक्षा अधिक राहील. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख ४० हजार हेक्टरवर मका लागवड झाली होती. धुळे व नंदुरबारमध्येही मका लागवडीत मोठी वाढ शक्य आहे. सोयाबीनची पेरणीदेखील वाढणार आहे. परंतु महाग बियाणे व उगवणीसंबंधी येणाऱ्या अडचणी यामुळे सोयाबीन पेरा फारसा वाढणार नाही, अशीही स्थिती आहे.

मका वाणांना मागणी वाढली

खानदेशात तीन-चार कंपन्यांच्या मका वाणांना मोठी मागणी दिसत आहे. या कंपन्यांकडून मका वाणांचा पुरवठा झाला आहे. परंतु मागणी अधिक आहे. कारण क्षेत्रात वाढ होईल. या स्थितीत पुढे काही मका वाणांची टंचाई तयार होईल, असेही सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सततच्या पावसाने ऊस पीक धोक्यात

Crop Damage Survey : सांगली जिल्ह्यातील दीड हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले

Bajari Sowing : खानदेशात बाजरी पीक जोमात

Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळणार १२७ कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT