PDKV Maize Variety : पीडीकेव्ही आरंभ मका ठरणार शेतकऱ्यांना वरदान

Hybrid Maize Variety : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमधून रब्बीसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित होणारा हा पहिलाच वाण ठरला आहे.महाराष्ट्रात सुमारे शंभर शेतकऱ्यांकडे वाणााचे प्रात्यक्षिक वा चाचण्या झाल्या असून, हा वाण येत्या काळात वरदान ठरू शकणार आहे.
Maize Farming
Maize FarmingAgrowon
Published on
Updated on

Maize Farming Maharashtra : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत बुलडाणा कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामध्ये भरडधान्यांवरही संशोधन केले जाते. येथील प्रमुख संशोधक डॉ. दिनेश कानवडे व सहकाऱ्यांनी मक्याचा संकरित वाण विकसित केला आहे. बीएमएच १८-२ अर्थात पीडीकेव्ही ‘आरंभ असे त्याचे नाव आहे.

तमिळनाडू कृषी विद्यापीठात पार पडलेल्या वार्षिक राष्ट्रीय सभेत नऊ राज्यांत रब्बी हंगामासाठी तर महाराष्ट्रात खरिपासाठी या वाणाची ॲग्रेस्को शिफारस करण्यात आली आहे.मेहनत, ‘फील्ड ट्रायल्स’, विविध राज्यांतील जमिनी, हवामान यांचा अभ्यास या सर्व प्रक्रियांमधून आरंभ वाण विकसित करण्यात आला. महाराष्ट्रातील सुमारे शंभर शेतकऱ्यांकडे वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Maize Farming
Maize Farming : मराठवाडा झाला मक्याचे ‘हब’

आरंभ वाणाची वैशिष्ट्ये

देशातील दोन महत्त्वाच्या विभागांसाठी वाण प्रसारित. यात द्वीपकल्पीय विभागांतर्गत (Peninsular Zone) महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण ही राज्ये आहेत.

दुसरा विभाग मध्य पश्चिम विभाग (Central West Zone) असून मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि

छत्तीसगड या राज्यांचा त्यात समावेश आहे.

द्वीपकल्पीय विभागात सरासरी उत्पादन क्षमता- १११.१० क्विंटल प्रति हेक्टर.

तर मध्य पश्‍चिम विभागासाठीही उत्पादन क्षमता ९९.७ क्विंटल.

मध्यम कालावधीत म्हणजे ९५ ते १०० दिवसांत परिपक्व होते.

टार्सिकम करपा रोगाला व खोडकिडीला मध्यम प्रतिकारक. कणीस अवस्थेत अमेरिकन लष्करी अळीला मध्यम प्रतिकारक. दाणे पिवळसर नारिंगी रंगाचे, अर्ध खळीदार आणि टपोरे.

कणीस आकार दंडगोलाकार. त्याच्या टोकापर्यंत दाणे भरत असल्याने त्यांचे प्रमाण जास्त मिळते. त्यामुळे व्यावसायिक दृष्टीने वाणाचे महत्त्व मोठे.

पीडीकेव्ही आरंभ वाणाचे पुरेसे बियाणे उपलब्ध झाल्यानंतर येत्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांना काही अटींवर बीजप्रक्रियेसाठी ते उपलब्ध करण्याचा विचार आहे. सरकारी यंत्रणांद्वारेही त्याचे बियाणे शेतकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न आहे.

‘इथेनॉल’मुळे भविष्य उज्ज्वल

देशात इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार आणि उद्योग जगत मक्यावर भर देत आहेत. बुलडाणासारख्या जिल्ह्यात खरीप, रब्बीत मक्याचे क्षेत्र २५ ते ३० हजार हेक्टरपर्यंत वाढत आहे. उसाच्या तुलनेत कमी कालावधीत हे पीक तयार होते. अनेक राज्यांमध्ये त्याचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

सरकारने २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी उसावरील ताण कमी करून विविध स्रोतांमधून इथेनॉल उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न आहे. मका हा त्यासाठी प्रमुख पर्याय मानला जातो. अशा परिस्थितीत अधिक उत्पादनक्षम वाण मिळाले तर शेतकऱ्यांसाठी ही नवीन संधी होईल असे पैदासकार डॉ. कानवडे यांना वाटते.

डॉ. दिनेश कानवडे ८३०६३६८७८

पैदासकार, डॉ. पंदेकृवि संशोधन केंद्र, बुलडाणा

Maize Farming
Maize Variety : ‘पंदेकृवि’चे हेक्टरी १०१ क्विंटल उत्पादन देणारे मका वाण विकसित

शेतकरी अनुभव

नोव्हेंबरमध्ये मक्याच्या तीन वेगवेगळ्या वाणांची लागवड केली होती. त्यात दीड एकरात आरंभ वाण घेतला होता. या क्षेत्रात ४० ते ५० क्विंटल दरम्यान उत्पादन मिळाले. अन्य वाणांच्या तुलनेत त्याचे कणीस सर्वांत चांगले होते. त्यात दाण्याच्या १४ ते १६ ओळी होत्या. ओल्या दाण्यांचे वजन २२० ग्रॅम तर सुकलेल्या दाण्यांचे वजन १८० ते १९० ग्रॅम भरले.

एकूण व्यवस्थापन चोख ठेवल्याने प्रत्येक झाडाला लागलेली दोन्ही कणसे मोठीच होती. पोंगा पोखरणाऱ्या अळीचे प्रमाण तुलनेने कमी दिसून आली. मागील वर्षापासून शून्य मशागत तंत्रज्ञानाने शेती करीत आहे. खरिपात सोयाबीनचे पीक घेतल्यानंतर त्याच क्षेत्रात टोकण पद्धतीने मक्याची लागवड केली होती. आता पुन्हा मका काढलेल्या शेतात मशागत न करतात सोयाबीन, तुरीची लागवड करणार आहे.

- स्वप्नील दीपक महाजन ९९२२५२१५२१ चिखली, जि. बुलडाणा

जागतिक हवामान बदलाचे पार्श्‍वभूमीवर मक्याच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची गरज आहे. आरंभ त्यादृष्टीने महत्त्वाचा वाण ठरेल. केंद्र सरकारच्या धोरणानुसार इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी देखील मक्याची मागणी वाढत आहे. त्याद्वारे शाश्‍वत व्यावसायिक शेती पद्धतीला निश्‍चितच हातभार लागेल.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
एकच पीक पद्धतीमुळे किडी-रोग तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांच्या कमतरता या समस्या वाढत आहेत. पिकांची उत्पादकता कमी होत आहे. अशावेळी विद्यापीठाने पुढाकार घेऊन पीडीकेव्ही आरंभ या वाणाची निर्मिती केली आहे. नऊ राज्यांसाठी हा वाण प्रसारित करण्यात आला ही गौरवाची बाब आहे.
-डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, पंदेकृवि, अकोला
मक्याची जून, जुलैत लागवड करणे गरजेचे असते. आमच्या प्रक्षेत्रावर ऑगस्टमध्ये त्याची लागवड केली. त्यात हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादन मिळाले. कमी पाण्याच्या काळात सुद्धा उत्पादन अधिक चांगले मिळाले. मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांत ३० ते ४० शेतकऱ्यांच्या शेतांमध्येही घेतलेल्या चाचण्यांमध्ये चांगले उत्पादन मिळाले आहे.
-डॉ. महेश म्हस्के, शास्त्रज्ञ, बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशिया (बिसा, जबलपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com