Kolhapur News: इस्राईल-इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जिल्ह्यातील गूळ व्यापारावरही दिसू लागला आहे. कारण वाहतुकीच्या अडचणीमुळे परदेशात होणारी गुळाची निर्यात थांबली आहे. वाहतूक, जहाजमार्ग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाल्याने व्यापारी मोठा धोका पत्करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. परिणामी कोल्हापूरच्या गुळाची निर्यात जवळपास ठप्प झाली असून व्यापारी आता देशांतर्गत बाजारपेठांकडे वळताना दिसत आहेत. .जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळघरे आणि गूळ बाजारपेठांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात गूळ देशातील विविध राज्यांमध्ये तसेच परदेशात निर्यात केला जातो. विशेषतः मध्यपूर्वेतील काही देश, श्रीलंका, बांगलादेश तसेच आशियातील काही बाजारपेठांमध्ये कोल्हापुरी गुळाला चांगली मागणी असते. कोल्हापुरातून थेट निर्यात फारशी होत नसली तरी काही व्यापारी चांगल्या प्रतीचा गूळ मुंबईच्या व्यापाऱ्यांना पाठवतात. तेथून तो गूळ निर्यातदारांकडून परदेशात पाठवला जातो..Agricultural Export: परभणीत ‘महानिर्यात-इग्नाईट’ कार्यशाळा.सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार साखळीवर परिणाम झाला आहे. जहाज वाहतुकीच्या मार्गांमध्ये असलेला धोका, विमा खर्च वाढणे, तसेच पेमेंट व्यवहारांमधील अनिश्चितता यामुळे व्यापारी निर्यात व्यवहार करण्यास पुढे येत नाहीत. काही व्यापाऱ्यांनी आधीच केलेल्या व्यवहारांबाबतही सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे गुळाच्या निर्यातीमध्ये मोठी घट झाली आहे. गूळ जागेवर वेळेत पोहोचेल की नाही या बाबत अनिश्चितता आहे. गुळाबरोबर अन्य शेतीमालही बंदरावर पडून असल्याने समुद्र मार्गाने निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..Jaggery Factory Employment: गूळ कारखान्यामुळे मिळाला शंभर कुटुंबांना रोजगार.निर्यातीच्या अनिश्चिततेमुळे व्यापाऱ्यांनी देशांतर्गत बाजारपेठांचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये गुळाची विक्री वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे..जोखीम पत्करण्यास कोणीही तयार नाहीगूळ खरेदी करून तो परदेशात पाठविण्यासाठी त्याला दर्जेदार पॅकिंग करावी लागते. किमान पंधरा दिवस तरी दर्जा टिकेल याची काळजी घेतली जाते. युद्ध सुरू होऊन आठवड्याहून अधिक कालावधी झाला आहे. पंधरा दिवसांनंतर गूळ ओलसर होण्यास सुरुवात होते. यामुळे गूळ पाठवला आणि तसाच तो बंदरात पडून राहिला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ही जबाबदारी कोणीही स्वीकारण्यास तयार नसल्याने निर्यातीसाठीचे दळणवळण ठप्प झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.