Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : बाजार समित्यांत मक्याची आवक निम्म्याने घटली

Mazie Market Update : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक गेल्या पाच-सहा दिवसात निम्म्याने घटली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे मधील आवक निम्म्याने घटली.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक गेल्या पाच-सहा दिवसात निम्म्याने घटली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे मधील आवक निम्म्याने घटली. दरात किंचित सुधारणा होऊन किमान १६०० व कमाल १७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. परंतु आणखी दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

एप्रिलमध्ये अमळनेर, जळगाव, चोपडा येथील बाजारात मक्याची प्रतिदिन सरासरी तीन हजार क्विंटल आवक झाली. मे महिन्यात ही आवक प्रतिदिन सरासरी १५०० क्विंटल एवढीच होती. यात जळगाव बाजार समितीमधील आवक नगण्य होती.

मक्याची लागवड, उत्पादन खानदेशात यंदा वाढले होते. आवक मे मध्ये अधिक होती. मध्यंतरी मका दर कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटल होते. पण एप्रिलमध्ये त्यात घसरण सुरू झाली. यामुळे या हंगामात लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नफा कमी मिळाला.

यंदा आवक सुरवातीपासून चांगली होती. अनेकांनी १६०० ते १६५० रुपये प्रतिक्विंटल या दरात थेट शिवार खरेदी केली. तर काही शेतकऱ्यांनी बाजारात मक्याची पाठवणूक केली. दरातही फारशी वाढ झाली नाही. परंतु शासकीय खरेदी सुरू होण्याची चिन्हे नसल्याने शेतकऱ्यांनी मका विक्री सुरूच ठेवली.

सध्या काही शेतकऱ्यांकडे मका शिल्लक आहे. त्याचे प्रमाण कमी आहे. काही शेतकरी शासकीय खरेदीची प्रतीक्षा करीत आहेत. कारण बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. नुकसान भरून निघावे, खर्च निघावा, यासाठी किमान १८५० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.

खानदेशात मक्यासाठी जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, धुळ्यात शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारात नंदुरबार या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. या सर्वच बाजारांतील आवक मागील तीन ते चार दिवसांत कमालीची घटली आहे.

शेतकऱ्यांकडे मक्याचा साठा कमी

मक्याची आवक पुढे आणखी कमी होऊ शकते. कारण शेतकऱ्यांकडे फारसा साठा नाही. तसेच शासकीय खरेदी सुरू झाल्यास बाजारातील आवक अतिशय नगण्य राहील. यामुळे पशुखाद्य निर्माते व इतर प्रक्रिया उद्योजकांना मक्यासाठी विविध भागांत जाऊन शोधाशोध करावी लागेल, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT