Maize Update : मक्याचे क्षेत्र वाढवण्याचा का केला जातोय विचार?

Team Agrowon

इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन

इथेनॉल निर्मितीसाठीचा साखर उद्योगावरील ताण कमी करण्याचा भाग म्हणून केंद्राच्या वतीने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Maize Update | Agrowon

उत्पादन वाढ

मक्याचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Maize Update | Agrowon

मका संशोधन केंद्राशी संपर्क

देशभरातील मका संशोधन केंद्राशी संपर्क साधून मक्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी दिली.

Maize Update | Agrowon

इथेनॉलची गरज

२० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी १००० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. तर अन्य उपयोगासाठी ३७६ कोटी लिटरची गरज आहे.

Maize Update | Agrowon

धान्याचे उत्पादन वाढवण्याची गरज

ठरावीक मर्यादेच्या पलीकडे ऊस क्षेत्र वाढू शकत नाही. यामुळे धान्याचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. यामुळे येथून पुढे लक्ष्यांक गाठण्यासाठी मका सारख्या पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात सरकार आहे.

Maize Update | Agrowon

देशात किती मका उत्पादन?

सध्या देशात ३४० लाख टन मक्याचे उत्पादन होते. पुरेशा प्रमाणात इथेनॉलनिर्मिती होण्यासाठी ४२० लाख टन मक्याच्या उत्पादनाची गरज आहे.

Maize Update | Agrowon

संशोधन केद्रांशी समन्वय

मक्यावर काम करणाऱ्या संशोधन केद्रांशी समन्वय साधून देशात कोणत्या ठिकाणी मक्याच्या लागवडीला किती प्रमाणात वाव आहे याविषयी चर्चा करण्यात येईल.

Maize Update | Agrowon

पोल्ट्री खाद्य

मक्याच्या उत्पादनापैकी ४० टक्के मका पोल्ट्री खाद्यासाठी वापरला जातो. १३ टक्के चाऱ्यासाठी वापरला जातो. १२ टक्के औद्योगिक वापरासाठी वापरला जातो.

Maize Update | Agrowon
Organic Farming | Agrowon
अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.