Akola News: ‘‘मी मुख्यमंत्री आहे जोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तसेच सौरऊर्जा प्रकल्पांतून मिळणाऱ्या विजेमुळे या भागातील शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून देऊ,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवरखेड (ता. तेल्हारा) येथे प्रचार सभेत दिले..नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ येथे सभा झाली. या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे यांच्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार उपस्थित होते. हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवू या, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले..Electricity Bill Recovry: छत्रपती संभाजीनगर परिमंडळात तीनशे कोटींची वीजबिल थकबाकी.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की आज देशाच्या ‘जीडीपी’पैकी ६५ टक्के योगदान शहरांकडून येते. त्यामुळे पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पाणी, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन आणि परवडणाऱ्या घरांच्या सुविधा मजबूत करण्याचे मोदी सरकारचे ध्येय आहे. अटल अमृत योजना, शहरी सुधार प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून कोट्यवधींचा निधी मिळाला आहे..CM Devendra Fadnavis: आधुनिक उत्पादन क्षेत्रासाठी ‘राज्य अभियान’ राबविणार .वान धरणाचे हक्काचे पाणी कोणालाही घेऊ देणार नाही. सिंचन प्रकल्पांसाठी भरघोस निधी दिला आहे. अकोला-खंडवा रेल्वे मार्गामुळे उत्तर-दक्षिण भारताचे अंतर तीन तासांनी कमी होणार असून त्याचा थेट फायदा या भागातील शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळण्यात होईल. केंद्र-राज्याबरोबर नगर परिषदेतही आपली सत्ता आवश्यक आहे, तरच विकासाची गती थांबणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या वेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुलभा दुतोंडे (हिवरखेड), मायाताई धुळे (अकोट), वैशाली पालिवाल (तेल्हारा) यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले..कोण प्रदेशाध्यक्ष, मी ओळखतही नाही?काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. या बाबत चिखली (जि. बुलडाणा) येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की हा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा आहे, असे कुणीतरी मला सभेपूर्वी सांगून तुम्हाला त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधी आहे, असे म्हटले होते. परंतु कोण प्रदेशाध्यक्ष आहेत, मी पण त्यांना ओळखत नाही. महाराष्ट्रात कुणीही त्यांना ओळखत नाही. त्यामुळे मी कशाला वेळ वाया घालवू. ज्यांना कुणी ओळखत नाही, मानत नाही त्यांच्यावर मी कशाला बोलू. मी सकारात्मकरित्या मते मागायला आलो आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.