Maize Sowing News : मक्याचे क्षेत्र वाढविण्याचा विचार

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीसाठीचा साखर उद्योगावरील ताण कमी करण्याचा भाग म्हणून केंद्राच्या वतीने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
Maize Sowing
Maize Sowing Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : इथेनॉल निर्मितीसाठीचा साखर उद्योगावरील ताण कमी करण्याचा भाग म्हणून केंद्राच्या वतीने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

मक्याचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येणार आहेत. देशभरातील मका संशोधन केंद्राशी संपर्क साधून मक्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी दिली.

२० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी १००० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. तर अन्य उपयोगासाठी ३७६ कोटी लिटरची गरज आहे. यापैकी निम्मे इथेनॉल उत्पादन साखर उद्योगातून तयार होते. यामुळे उर्वरित इथेनॉलसाठी धान्यावरच अवलंबून राहावे लागते. सध्या उसाचे क्षेत्र वाढविण्याला मर्यादा आहे.

Maize Sowing
Maize Market : मक्याचे भाव वाढतील का?

ठरावीक मर्यादेच्या पलीकडे ऊस क्षेत्र वाढू शकत नाही. यामुळे धान्याचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. यामुळे येथून पुढे लक्ष्यांक गाठण्यासाठी मका सारख्या पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. इतर अन्नधान्याच्या तुलनेत मक्याची लागवड कमी आहे.

सध्या देशात ३४० लाख टन मक्याचे उत्पादन होते. पुरेशा प्रमाणात इथेनॉलनिर्मिती होण्यासाठी ४२० लाख टन मक्याच्या उत्पादनाची गरज आहे. यासाठी मक्यावर काम करणाऱ्या संशोधन केद्रांशी समन्वय साधून देशात कोणत्या ठिकाणी मक्याच्या लागवडीला किती प्रमाणात वाव आहे याविषयी चर्चा करण्यात येईल. यानुसार मक्याचे लागवड वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Maize Sowing
Maize Procurement : छत्रपती संभाजीनगरमध्ये मका खरेदीला मुहूर्त नाही

देशात सर्वाधिक उत्पादन कर्नाटकात

मक्याच्या उत्पादनापैकी ४० टक्के मका पोल्ट्री खाद्यासाठी वापरला जातो. १३ टक्के चाऱ्यासाठी वापरला जातो. १२ टक्के औद्योगिक वापरासाठी वापरला जातो. १४ टक्के स्टार्च उद्योगात वापरला जातो.

मक्याचे क्षेत्र वाढवून त्याचा उपयोग जास्तीत जास्त इथेनॉलसाठी करण्याचे सरकारचे नियोजन आहे. भारताच्या एकूण मका उत्पादनापैकी मका उत्पादनात १६ टक्के वाटा कर्नाटकचा आहे. मध्य प्रदेशात ११ टक्के, तर महाराष्ट्रात १० टक्के उत्पादन मक्याचे होते. राजस्थान, तेलंगणामध्ये ही मक्याचे उत्पादन होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com