Satara News: ‘‘विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र राज्यात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे, असे मंत्री मकरंद पाटील यांचे वक्तव्य आहे. त्यामुळे ती कर्जमाफीची वेळ कधी येणार आहे,’’ असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप या सरकारने केल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली..ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाड (जि. सातारा) येथील त्यांच्या समाधिस्थळी खासदार सुळे यांनी मंगळवारी (ता. २५) अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..Supriya Sule: शेतकरी अडचणीत, शक्तिपीठ करण्यापेक्षा ८० हजार कोटींची सरसकट कजर्माफी द्या, सुप्रिया सुळेंची मागणी.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत ‘निधी माझ्याकडे आहे’, तर मंत्री चंद्रकांत पाटील ‘चावीचा मालक आमचा आहे’ असे म्हणत आहेत. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या, की निवडणुकीमुळे नेत्यांकडून अशी विधाने केली जात आहेत. माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की राज्याची तिजोरी ही राज्यातील जनतेकडे असते. तो पैसा जनतेचा आहे, त्यामुळे त्याचा मालक ही जनता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जनतेला तो हक्क दिला आहे..Farmers Crisis: उत्तर कर्नाटकमध्ये यावर्षी १३ लाख हेक्टर पिकांचे नुकसान; तुरीचे उत्पादन धोक्यात.माजी मंत्री धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराड यांची आठवण काल झाली, त्या प्रश्नावर खासदार सुळे यांनी म्हणाल्या, की मुंडे यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते. कोणाच्यातरी वडिलांची, महाराष्ट्राच्या लेकाची क्रूर हत्या ज्यांनी केली अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. अशा प्रवृत्तीला कोणत्याही पक्षातून मदत करण्याची भूमिका होत असेल तर त्या पक्षातून त्यांना काढून टाकले पाहिजे, अशी माझी पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे..खासदार सुळे लिहिणार मुख्यमंत्र्यांना पत्रमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दरवर्षी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र या वेळी ते आले नाहीत, या बाबत सुळे म्हणाल्या, की ते त्यांच्या कामात व्यस्त असतील, मला माहिती नाही. त्यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र प्रशासनाकडून मला फार हालचाल दिसत नाही. मी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे राज्याचे नाहीत तर देशाचे नेते आहेत असे कळवणार आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी प्रशासन मात्र इथे कुठेही दिसले नाही, हे दुर्दैव आहे. त्यांचा मानसम्मान ठेवलाच पाहिजे. ते मी मुख्यमंत्री यांना आजच पत्र लिहून कळवणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.