Sugarcane Crushing Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane Crushing : देशात ऊस गाळपात महाराष्ट्राची आघाडी

यंदाच्या हंगामात राज्यातील साखर हंगाम उशिरा सुरू होऊनही ऊस गाळपात राज्याने देशात आघाडी घेतली आहे. १५ नोव्हेंबरअखेर देशात १९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात राज्यातील साखर हंगाम (Sugar Season) उशिरा सुरू होऊनही ऊस गाळपात (Sugarcane Crushing) राज्याने देशात आघाडी घेतली आहे. १५ नोव्हेंबरअखेर देशात १९ लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसे उत्पादन कमी आहे. गेल्या वर्षी २० लाख टन साखरेचे उत्पादन या कालावधीत झाले होते.

देशात ३२१ साखर कारखाने सुरू झाले आहेत. या पैकी सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. राज्यात १४१ कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी ८ लाख टन साखर तयार केली आहे. उत्तर प्रदेशात ७६ कारखाने सुरू झाले आहेत. या खालोखाल कर्नाटकात ६२ कारखाने सुरू झाले आहेत.

यंदा महाराष्ट्र व कर्नाटकात ऊस हंगाम जवळजवळ पंधरा दिवस ते तीन आठवडे लांबला. यामुळे देशाचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होऊनही उत्पादन कमी राहिले. महाराष्ट्राचा हंगाम नियमितपणे सुरू होण्यास नोव्हेंबरचा पहिला आठवडा उलटला. राज्यात एक नोव्हेंबरपासूनच ऊस तोडणीस हळूहळू गती आली. यामुळे देशाचा ऑक्टोबर महिन्याचा उत्पन्नाचा आलेख गेल्या वर्षीपेक्षा पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आला.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर मात्र पाऊस थांबल्याने परिस्थिती सुधारत गेली. त्यामुळे आता कारखान्यांनी वेग घेतला आहे. उत्तर प्रदेशातील हंगाम जवळजवळ महाराष्ट्राप्रमाणेच सुरू झाला. यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर उत्पादनास एकदमच गती आल्याचे चित्र दिसले. सध्या देशात कुठेही पावसाचे फारसे वातावरण असल्याने हंगामाची गती कायम राहील, अशी शक्यता आहे.

दोन लाख टन निर्यात कमी

गेल्या वर्षी खुल्या निर्यातीस परवानगी असल्याने देशातील साखर कारखान्यांनी केल्यापासूनच निर्यात करार व पाठवणीत आघाडी घेतली होती. यंदा सुमारे ३५ लाख टनांचे करार झाले असले, तरी प्रत्यक्षात केवळ दोन लाख टनांची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत चार लाख टनांची प्रत्यक्षात निर्यात झाली होती.

कोटा आणि प्रत्यक्ष निर्यातीची कसरत

यंदा कारखानानुसार कोटा दिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्यक्षात निर्यातीचा वेग कमी राहील, अशी शक्यता आहे. यंदा केंद्राने निर्यात धोरणास उशीर केल्याने कारखान्यांनी धोरण जाहीर होण्याआधीच निर्यात करार केले होते. आता कारखान्यांना मिळालेला कोटा व प्रत्यक्षात निर्यात याची कसरत करावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू बाजारात चढ-उतार, झेंडू बाजारात तेजीत, टोमॅटो बाजारात चढ-उतार , केळी बाजारात तेजी, डाळिंब आवकेत घट

Lift Irrigation : उपसा सिंचनच्या पाणीवापरासाठीचे दर निश्चित

Manoj Jarange Patil Protest: मी मुंबईला एकटाच निघणार, योग्यवेळी तुम्हाला बोलवेन; मनोज जरांगेंचा निर्णय

Water Crisis Management : संभाव्य टंचाईसाठी काटेकोर तयारी करा

Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढील ५ दिवसांचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT