Sugarcane Cultivation : एक लाख १८ हजार हेक्टरवर ऊस लागवडी

पावसाळ्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत आडसाली व पूर्व हंगामी उसाची एक लाख १८ हजार २६३ हेक्टरवर लागवड झाली आहे.
Sugarcane cultivation
Sugarcane cultivationAgrowon
Published on
Updated on

पुणे ः पावसाळ्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊस लागवडीच्या क्षेत्रात (Sugarcane Cultivation Area) वाढ होत आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत आडसाली व पूर्व हंगामी उसाची (Sugarcane Farming) एक लाख १८ हजार २६३ हेक्टरवर लागवड झाली आहे. येत्या काळात या क्षेत्रात आणखी वाढ होऊन पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात गाळपासाठी ऊस (Sugarcane Crushing) उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

चालू वर्षी शेतकऱ्यांनी जूनपासून ऊस लागवडींना सुरुवात केली आहे. पुणे विभागातील बागायती भागातील शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. जूनमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती असताना पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले.

Sugarcane cultivation
Sugarcane FRP : ...अन्यथा २५ नोव्हेंबरला चक्का जाम करू; राजू शेट्टी यांचा इशारा

विभागात ऑक्टोबर अखेरपर्यंत आडसाली उसाच्या लागवडी झाल्या आहेत. त्यानंतर पूर्वहंगामी उसाच्या लागवडी सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उसाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविण्यात येण्यात येत आहे.

दरवर्षी होत असलेल्या पावसामुळे पुणे विभागातील मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत यांसह अनेक धरणांत पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. मात्र इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्‍वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात.

Sugarcane cultivation
Sugarcane Harvesting : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत ऊसतोडी बंद

त्यामुळे बहुतांश शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाचा थोड्याफार प्रमाणात खंड पडला असला तरी अनेक ठिकाणी कमी-अधिक पाऊस पडला. त्यामुळे ऊस लागवडी खोळंबल्या असल्या तरी जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला.

पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी ३ लाख ७० हजार ७८१ हेक्टर क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, कोपरगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील दौंड, हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर या तालुक्यांतही काही प्रमाणात लागवडी झाल्या आहेत. तर मुळशी, मावळ, वेल्हे, खेड ही तालुके उसाच्या लागवडीपासून दूर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट या तालुक्यांत बऱ्यापैकी लागवडी झाल्या आहेत. तर बार्शी, सांगोला, सोलापूर तालुक्यांत कमी लागवडी आहेत.

दृष्टिक्षेपात...

जिल्हानिहाय आडसाली ऊस क्षेत्र (हेक्टरमध्ये) ः

जिल्हा ---- सरासरी क्षेत्र --- उसाची लागवड

नगर --- १,०२,६१३ -- २२,७७३

पुणे --- १,३०,६३१ -- ६३,८०१

सोलापूर --- १,३७,५३६ ---३१६९०

एकूण --- ३,७०,७८१ -- १,१८,२६३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com